मागील काही दिवसांपासून एका स्पर्धेविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजेच आयपीएल होय. आयपीएल रिटेन्शन पार पडले. यानंतर मोठी अदलाबदल पाहायला मिळाली. रिटेन्शननंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने कॅमरून ग्रीन याला मुंबई इंडियन्सकडून ट्रेड केले. आरसीबीने ग्रीनसाठी 17.50 कोटी रुपये मोजले. ग्रीन शानदार गोलंदाजीसोबतच विस्फोटक फलंदाजीसाठीही ओळखला जातो. त्याचे संघात आल्याने संघाला चांगले संतुलन मिळेल. ग्रीन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसेच, तो टी20 क्रिकेटमध्ये काही चेंडूंमध्येच सामन्याची दिशा बदलतो. आरसीबी संघात त्याची नेमकी भूमिका काय असेल, याविषयी संघाचे संचालक मो बोबाट यांनी मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले संचालक?
आरसीबी क्रिकेट संचालक मो बोबाट (RCB Cricket Director Mo Bobat) यांनी म्हटले की, कॅमरून ग्रीन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Cameron Green Royal Challengers Bangalore) संघासाठी एक विस्फोटक पॅकेज असू शकते. खासकरून चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये. आरसीबी बोल्ड डायरीजमध्ये ते म्हणाले, “मधल्या फळीत पॉवर हिटरच्या भूमिकेसाठी तो बिल्कुल फिट आहे. तो शानदार आणि कुशल फलंदाज आहे. त्याच्याकडे वेग आणि फिरकी गोलंदाजी खेळण्याचे शॉट आहेत. ग्रीन शानदार क्षेत्ररक्षकही आहे. त्याने अलीकडील काळात चांगले क्षेत्ररक्षण करून झेलही पकडले आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षण करताना तो खूपच प्रभावी आहे.”
Go Green! 💚
We can't wait for our new Caped Crusader to represent us in the 𝑹𝒆𝒅 𝒂𝒏𝒅 𝑮𝒐𝒍𝒅. 🦸♂️#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 @CameronGreen_ pic.twitter.com/axvXcpVFL0
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 28, 2023
आरसीबीचे नवीन मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर हेदेखील कॅमरून ग्रीन (Cameron Green) याला संघात सामील करण्यासाठी उत्साही होते. त्यांनी म्हटले की, “आमचे लक्ष वास्तवात मधल्या फळीच्या आसपास होते. आम्ही मधल्या फळीत सुधारणा करू शकतो. आम्हाला विदेशी खेळाडूंचे योग्य संतुलन बनवायचे आहे. आजच्या काळात अष्टपैलू महत्त्वाचे आहेत. अशात आम्ही खूप चर्चा केली आणि ग्रीनची एन्ट्री झाली.”
आरसीबीकडे किती पैस?
कॅमरून ग्रीनच्या एन्ट्रीनंतर आरसीबीकडे आयपीएल 2024 (IPL 2024) लिलावापूर्वी 23.25 कोटी रुपये उरले आहेत. संघाने आयपीएल रिटेन्शनमध्ये 11 खेळाडूंना रिलीज केले आहे. त्यात वनिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, फिन ऍलन, मायकल ब्रेसवेल, डेविड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव यांचा समावेश आहे. तसेच, ट्रेडमार्फत त्यांनी शाहबाज अहमदला सनरायझर्स हैदराबादमध्ये पाठवले आहे.
आरसीबीचे रिटेन खेळाडू
फाफ डू प्लेसिस, रजत पाटीदार, विराट कोहली, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, विशक विजयकुमार, मयंक डागर आणि कॅमरून ग्रीन (ट्रेडमधून संघात घेतले.) (rcb team director of cricket mo bobat on cameron green role in team read here)
हेही वाचा-
INDvsAUS 3rd T20: निसर्गाने नटलेल्या गुवाहाटीत बलाढ्य संघ भिडणार, पीचमधून कुणाला मिळणार फायदा? वाचा
चॅम्पियन चावला! क्रिकेट कारकिर्दीत पूर्ण केल्या 1000 विकेट्स, 34 व्या वर्षीच गाठला मैलाचा दगड