बुधवारी (३० मार्च) आयपीएलच्या मैदानात कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत झाली. या सामन्यात आरसीबीने ३ विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यात गोलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल असल्याचे दिसले. आरसीबीला विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला, तर केकेआरला मात्र शेवटच्या षटकात पराभव पत्करावा लागला. सामन्यात शेवटच्या दोन षटकांमध्ये केकेआरच्या कर्णधाराने एक मोठी चूक केली, जी समालोचकांनी क्षणाचाही विलंब न करता ओळखली होती.
आरसीबाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरचा संपूर्ण संघ अवघ्या १२८ धावांवर गुंडाळला गेला आणि विजयासाठी आरसीबीला १२९ धावांचे लक्ष्य मिळाले. आरसीबीने हे लक्ष्य ७ विकेट्सच्या नुकसानावर आणि १९.२ षटकांमध्ये गाठले.
आरसीबीच्या फलंदाजीवेळी १८ व्या षटकातनंतर त्यांना विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. यावेळी सामन्याचे समालोचन इरफान पठाण (Irfan Pathan), सुरेश रैना (Suresh Raina) आणि आकाश चोप्रा (Aakash Chopra) करत होते. त्यांच्या मते या १९ व्या षटकात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने मोठी चूक केली, ज्यामुळे त्यांच्या संघाला पराभव पत्करावा लागला.
आरसीबीने १८ षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १११ धावा केल्या होत्या. आरसीबीला यानंतर पुढच्या १२ चेंडूत १७ धावा करण्याची आवश्यकता होती आणि ३ विकेट्स शिल्लक होत्या. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) खेळपट्टीवर उपस्थित होते. दुसरीकडे केकेआरकडे आंद्रे रसलचे एक षटक राहिले होते आणि एक षटक वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer ) किंवा नीतीश राणा यांच्यातील एक जण करू शकत होता. अशा परिस्थितीत १९ व्या षटकात श्रेयसने वेंकटेशला गोलंदाजीसाठी बोलावले आणि त्याच वेळी समालोकांनी त्याच्या या निर्णयावर शंका व्यक्त केली.
श्रेयसने १९ वे षटक वेंकटेशला देताच समालोचक इरफान, आकाश आणि रैना म्हणाले की, ही एक मोठी चूक असू शकते. स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करणाऱ्या या माजी दिग्गजांच्या मते शेवटचे दोन षटक महत्वाचे असले, तर १९ व्या षटकाला अधिक महत्व दिले पाहिजे. याच पार्श्वभूमीवर श्रेयसने १९ व्या षटकात आंद्रे रसलला संधी दिली पाहिजे होते. समालोचकांचे म्हणणे अगदी खरे ठरले. वेंकटेशने टाकलेल्या १९ व्या षटकात आरसीबीने १० धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. त्यानंतर शेवटच्या षटकात रसल गोलंदाजीसाठी आला, पण कार्तिकने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्यावर चौकार मारत विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
रहाणेच्या मोठ्या विक्रमावर सिराजने फेरले पाणी; धोनी, विराटच्या क्लबमध्ये सामील होण्याची होती संधी
सचिनची २१ वर्षांपुर्वी पुण्यात १० हजार वनडे धावा करण्याची हुकली होती संधी
जंटलमन हॅश- दारुच्या ब्रँडचा लोगो जर्सीवर न लावल्यामुळे लाखो रुपये गमावलेल्या हशिम आमलाची गोष्ट