भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्मशी संघर्ष संपत नाहीय. आयपीएल २०२२ मध्ये विराट आरसीबीचा कर्णधार नाहीय, अशात फक्त फलंदाजीची जबाबदारी तो चांगल्या प्रकारे पार पाडेल अशी चाहत्यांना आशा होती. परंतु तसे होताना दिसत नाहीय. मंगळवारी (१९ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात विराट पहिल्या चेंडूवर आणि एकही धाव न करता बाद झाला.
तब्बल चार वर्षांनंतर असे झाले आहे, जेव्हा विराट कोहली (Virat Kohli) एखाद्या आयपीएल सामन्यादरम्यान गोल्डन डकवर बाद झाला आहे.
लखनऊविरुद्धच्या या सामन्यात विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. सलामीवीर अनुज रावतला दुश्मांता चमीराने पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर विराट फलंदाजीसाठी आला. चमीराच्या षटकातील शेवटचा चेंडू विराटने दीपक हुड्डाकडे मारला, जो त्याने कोणतीही चूक न करता झेलला. परिणामी आजच्याच दिवशी (१९ एप्रिल) वाढदिवस असलेल्या हुड्डामुळे विराटला शून्य धावांवर तंबूत परतावे लागले.
विराट त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत चार वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे. सर्वात पहिल्यांदा आयपीएल २००८ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना त्याने पहिल्याच चेंडूवर शुन्य धावांवर विकेट गमावली होती. त्यानंतर २०१४ मध्ये पंजाबविरुद्ध, २०१७ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध आणि आता म्हणजेच २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला आहे.
दरम्यान, लखनऊविरुद्धच्या या सामन्याच विचार केला, तर नाणेफेक गमावल्यामुळे आरसीबीला प्रथम फलंदाजी करावी लागली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने ६ विकेट्सच्या नुकसानावर १८१ धावा केल्या. यामध्ये विराटचे योगदान शून्य असेल तरी, सलामीवीर फाफ डू प्लेसिसने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने ६४ चेंडूत ९६ धावा केल्या. यादरम्यान डू प्लेसिसच्या बॅटमधून ११ चौकार आणि २ षटकार देखील निघाले.
विराटच्या चालू आयपीएल हंगामातील प्रदर्शनावर नजर टाकली, तर त्याने पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध ४१ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात केकेआरविरुद्ध १२, तिसऱ्या सामन्यात राजस्थाविरुद्ध ५, तर नंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध ४८ धावा केल्या होत्या. त्यानंतर सीएसकेविरुद्धच्या चौथ्या सासमन्यात विराट फक्त १ धाव करून बाद झाला. त्यानंतर विराट दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध १२ आणि आता लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध एकही धाव करू शकला नाहीय.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आमदार चषक राज्यस्तरीय ज्यूनियर ज्यूदो स्पर्धा २१ एप्रिलपासून
अनिल जी रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग २०२२ स्पर्धेत १० संघ सहभागी