---Advertisement---

RCB vs PBKS: ‘हा’ खेळाडू ठरला पंजाबसाठी डोकेदुखी, आरसीबीचा एकतर्फी विजय

On: शुक्रवार, मे 30, 2025 11:57 AM
---Advertisement---

आयपीएल 2025च्या पहिल्या क्वाॅलिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुरुवारी मुल्लानपूर येथे पंजाब किंग्जचा (PBKS) आठ विकेट्सने पराभव केला. या विजयासह आरसीबीने आठ वर्षांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. आरसीबीला विजयासाठी 102 धावांची आवश्यकता होती. संघाने फक्त 10 षटकांत 106/2 अशी धावसंख्या उभारून सामना जिंकला. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. ज्यामध्ये सुयश शर्माने देखील मोलाची भूमिका बजावली.

प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण पंजाब संघ 14.1 षटकांत 101 धावांवर आऊट झाला. ज्यामध्ये मार्कस स्टोईनिसने सर्वाधिक 26 धावा केल्या. आरसीबीच्या गोलंदाजांबाबत बोलायचे झाल्यास सुयश शर्माने सामन्यात मॅच विनिंग स्पेल टाकला. त्याने 3 षटकात 17 धावा देत 3 विकेटस् घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीकडून सलामीवीर फिल साॅल्टने तुफानी अर्धशतकी खेळी खेळली, त्याने 27 चेंडूत तीन षटकार आणि सहा चौकारांसह नाबाद 56 धावा केल्या. त्याच्यासोबत कर्णधार रजत पाटीदार आठ चेंडूत 15 धावा करून नाबाद राहिला. त्याने एक षटकार मारून सामना संघाच्या खिशाला टाकला. आरसीबीने 10 षटकांत दोन गडी गमावून 106 धावा करून सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---