आयपीएल २०२२ ला येत्या २६ मार्चपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी, आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. बेंगलोर संघ त्यांचा नवीन कर्णधार, संघाची जर्सी आणि इतर काही महत्त्वाची घोषणा शनिवारी (१२ मार्च) करणार आहे. बेंगलोर संघाचा पुढील कर्णधार फाफ डू प्लेसिस बनणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विराट कोहलीने मागील वर्षी आपण बेंगलोर संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे, विराटने २०११ ते २०२१ यादरम्यान बेंगलोर संघाचे नेतृत्व केले होते.
बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने आपल्या संघातील महत्त्वाच्या गोष्टींची घोषणा करण्यासाठी शनिवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. या बैठकीत संघ काय निर्णय घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आयपीएल २०२२ मधील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या चाहत्यांना त्यांच्या संघाचा पहिला सामना २७ मार्चला पाहायला मिळेल. बेंगलोर आणि पंजाब किंग्जमध्ये हा सामना खेळला जाईल.
https://twitter.com/RCBTweets/status/1500797118218653701?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1500797118218653701%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fcricketaddictor.com%2Findian-premier-league-ipl-2022%2Fipl-2022-rcb-likely-to-announce-faf-du-plessis-as-next-captain-on-march-12-reports%2F
बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघ साखळी फेरीत त्यांचा पहिला सामना २७ मार्चला पंजाब किंग्जविरुद्ध खेळणार असून शेवटचा सामना १९ मे रोजी खेळेल. हा शेवटचा सामना बेंगलोरला नवीन फ्रेंचायझी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे. दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने मागच्या हंगामापर्यंत बेंगलोरचे नेतृत्व केले होते, पण आगामी हंगामात संघाला नवीन कर्णधाराची आवश्यकता असणार आहे. मागच्या हंगामादरम्यान विराटने स्पष्ट केले होते की, हा त्या कर्णधाराच्या रूपातील शेवटचा हंगाम असेल. पुढच्या हंगामापासून तो खेळाडूच्या रूपात संघासोबत सामील होईल.
बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराटच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत २०७ सामने खेळताना ३७.४ च्या सरासरीने ६२८३ धावा कुटल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके आणि ४२ अर्धशतकेही ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अफलातून! पाकिस्तानी महिला विकेटकीपरचा ‘अद्भूत’ झेल; चाहत्यांंना आली थेट ‘माही’च्या ‘त्या’ कॅचची आठवण
दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी
दिवस-रात्र कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून ‘या’ गोलंदाजाला नारळ? सिराज किंवा अक्षरची लागेल वर्णी