इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील एलिमीनेटर सामना शुक्रवारी (6 नोव्हेंबर) खेळला गेला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात हा सामना झाला. बेंगलोरचा या सामन्यात 6 विकेट्सने पराभव झाला आणि स्पर्धेतील या संघाचं आव्हान संपुष्टात आलं. या पराभवामुळे आयपीएलचा किताब जिंकण्याच बेंगलोरच स्वप्न पुन्हा एकदा भंगल.
या हंगामात सलग पाच सामने गमावल्यानंतर बेंगलोर संघ स्पर्धेबाहेर पडला. आयपीएलचा 13 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी विराटला टीम कॉम्बिनेशनबद्दल विश्वास होता. परंतु संघाला या हंगामातही अपयश आले.
विशेष म्हणजे बेंगलोरने आत्तापर्यंत सर्व आयपीएल हंगाम खेळले आहेत. मात्र, त्यांना प्रत्येकवेळी विजेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे. त्यातही ते तीन वेळा अंतिम सामनाही खेळले आहेत. पण तिन्हीवेळेस ते उपविजेते ठरले.
आयपीएलच्या इतिहासात याआधीही बंगलोर किताब मिळवण्याच्या जवळ येऊन स्पर्धेतून बाहेर पडला होता. या लेखात आपण या संघाचा आयपीएलमधील इतिहास पाहाणार आहोत.
• आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 मध्ये बेंगलोर संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होता.
• सन 2009 मध्ये दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नेतृत्वात या संघाने अंतिम सामना खेळला पण उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांना अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्सने पराभूत केले.
• सन 2010 मध्ये संघाने उपांत्य फेरी गाठली होती.
• सन 2011 मध्ये बेंगलोरने अंतिम सामना खेळला होता. मात्र, त्या सामन्यात या संघाचा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळताना पराभव झाला होता. त्यामुळे त्यावेळी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
• सन 2012 आणि 2013 मध्ये बेंगलोर गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर राहिला होता.
• सन 2014 मध्ये बेंगलोरने अतिशय खराब कामगिरी केली. या हंगामात हा संघ 7 व्या स्थानावर होता.
• सन 2015 मध्ये, बेंगलोरने चांगले प्रदर्शन करत क्वालिफायर 2 सामना खेळला परंतु येथेही त्यांचा पराभव झाला आणि जेतेपद मिळवण्याचे स्वप्न पुन्हा भंगले.
• सन 2016 मध्ये कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगलोरने अंतिम सामना खेळला होता पण हैदराबादने या संघाला पराभूत करून विजेतेपद जिंकले होते.
• सन 2017 चा हंगाम या संघासाठी खूप खराब होता आणि संघ गुणतालिकेत तळाशी म्हणजेच गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर होता.
• सन 2018 मध्ये बेंगलोर 6 व्या स्थानावर होता, तर या संघाला 2019 मध्ये 8 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘नवीन JCB घेण्याच्या विचारात RCB चा मालक’, बेंगलोरच्या पराभवानंतर मीम्सचा पाऊस
दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा; आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूला डच्चू
‘कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, अन्यथा…’ माजी कर्णधाराचा कांगारुंच्या संघाला इशारा
ट्रेंडिंग लेख –
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा