---Advertisement---

‘हे’ खेळाडू करणार पुनरागमन! क्वालिफायर 1 साठी अशी असू शकते RCBची प्लेइंग 11

On: बुधवार, मे 28, 2025 9:37 PM
---Advertisement---

RCB Playing 11: यंदाच्या आयपीएलचा पहिला क्वालिफायर सामना उद्या म्हणजेच (29 मे) रोजी खेळवला जाणार आहे. त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघ न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर स्टेडियमवर आमने-सामने असतील. दोन्ही संघात फायनलच्या तिकिटासाठी चुरशीची लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी या सामन्यात आरसीबीची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते याबद्दल आपण जाणून घेऊया. (RCB vs PBKS Qualifier 1)

क्वालिफायर-1 मधील विजेता संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. म्हणजेच, बंगळुरू आणि पंजाबमधील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. लीग टप्प्याच्या शेवटी, पंजाब किंग्ज पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि आरसीबी दुसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे दोन्ही संघात क्वालिफायय 1 साठी लढत होणार आहे. (Qualifier 1 match will be played between RCB and Punjab.)

क्वालिफायर सामन्यात आरसीबी संघ बराच बदललेला दिसू शकतो. जेकब बेथलच्या जागी प्लेऑफ सामन्यांसाठी न्यूझीलंडचा टिम सेफर्ट आरसीबी संघात सामील झाला आहे. तसेच, जोश हेझलवूड देखील संघात परतला आहे. क्वालिफायर सामन्यात हेझलवूडचा खेळ जवळजवळ निश्चित आहे. (Josh Hazlewood could make a comeback to the team in the qualifiers)

आरसीबीच्या ओपनिंगबद्दल बोलायचे झाले तर, फिल सॉल्ट आणि विराट कोहली क्वालिफायरमध्येही डावाची सुरुवात करताना दिसतील. यानंतर, टिम सेफर्टला तिसऱ्या क्रमांकावर ट्राय केले जाऊ शकते. कर्णधार रजत पाटीदार चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. त्यानंतर जितेश शर्मा पाचव्या क्रमांकावर आणि मयंक अग्रवाल सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो.

यानंतर, टिम डेव्हिड फिनिशरच्या भूमिकेसाठी संघात परतू शकतो. तो सातव्या क्रमांकावर खेळू शकतो आणि कृणाल पंड्या आठव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. या हंगामात, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल गोलंदाजीत खेळताना दिसू शकतात. सुयश शर्मा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळू शकतो.

क्वालिफायर-1 मध्ये आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- फिल साल्ट, विराट कोहली, टिम सेफर्ट, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल (RCB’s playing 11 for Qualifier 1)

इम्पॅक्ट खेळाडू – सुयश शर्मा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---