आरसीबी संघाची 9 वर्षांचा आतुरता आता संपताना दिसतीये. 2016 नंतर पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अंतिम टप्प्यात स्थान पटकावले आहे. मुल्लापूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या क्वालिफायर मध्ये आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाब किंग्सच्या फलंदाजांना पाणी पाजलंय. पंजाब संघ केवळ 101 धावा करून बाद झाला. आठ फलंदाज दहाचा टप्पा ओलांडू शकले नाहीत. आरसीबीच्या सायलेंट सामनावीराने पंजाबच्या मजबूत फलंदाजीचा क्रम उद्ध्वस्त केला. केवळ क्वालिफायर फेरीतच नाही तर या गोलंदाजाने संपूर्ण हंगामात आपल्या गोलंदाजीने प्रत्येक कठीण काळात संघासाठी फायदेशीर ठरला आहे. संघाच्या प्रत्येक विजयात एक महत्वाची भूमिका बजावली आहे. परंतु, या सर्व गोष्टींचे क्रेडिट घेण्याची भूक याच्या नजरेत कधीच दिसली नाही.
आरसीबीच्या ज्या सायलेंट गोलंदाजाबद्दल आपण बोलत आहोत तो म्हणजे सुयश शर्मा. आयपीएल 2025 मध्ये सुयश ने मधल्या ओव्हर्स मध्ये उत्तेम कामगिरी केली आहे. फलंदाजांसाठी स्वर्ग समजल्या जाणाऱ्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये देखील सुयश ने उत्तम कामगिरी केली. 13 सामन्यात जरी केवळ 8 विकेट्स सुयशच्या नवी असल्या तरी, सुयशने ज्या प्रकारे खेळी केली त्यामुळे रजत साठी सामना अजून सोप्पा झाला.
असे म्हटले जाते की, मोठ्या सामन्यांचा खेळाडू मोठ्या सामन्यांमध्ये त्याच्या खेळाने सर्वांनाच शिष्य बनवतो. पहिल्या क्वालिफायरमध्ये सुयशने अशी कामगिरी करून दाखवली. 3 षटकांच्या स्पेलमध्ये सुयशने फक्त 17 धावा दिल्या आणि त्याच्या झटक्यात तीन मोठ्या विकेट्स आल्या. हे 3 विकेट्स मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग आणि मुशीर खान यांचे होते. स्टोइनिस आणि शशांक यांना सुयशने क्लिन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. घरच्या मैदानावर खेळत असूनही, पंजाबचे फलंदाज सुयशचे फिरकी चेंडू वाचण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. आरसीबी त्यांच्या सायलेंट सामनावीराकडून अंतिम फेरीत अशाच कामगिरीची अपेक्षा करेल.





