वयाच्या 17 व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करणार्या यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने आज अचानक निवृत्तीची घोषणा केली. पार्थिवने याबद्दलची माहिती समाज माध्यमावर दिली. पार्थिव पटेल अशाप्रकारे तडका फडकी निवृत्ती घेईल याची पुसटशी ही कल्पना कोणालाच नव्हती. या खेळाडूला भारतीय संघात तीन ही प्रकारात खेळण्याची संधी मिळाली होती. या खेळाडूनी गुजरातला पहिला रणजी करंडक जिंकून दिला होता
पार्थिवने भारतीय संघासाठी 25 कसोटी, 38 वनडे आणि 2 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले होते. त्याने 25 कसोटी सामन्यात 930 धावा, 38 वनडेत सामन्यात 736 धावा आणि 2 टी-20 सामन्यात 36 धावा आपल्या नावावर केल्या आहेत. पार्थिव भलेही आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरला नाही, परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची गणना दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते.
Congratulations #ParthivPatel on a very good career. Your determination to continue to work hard and dream big despite many challenges was fantastic and I wish the best for you in the future. Happy retirement Nikke ! pic.twitter.com/P0d4E0WjDk
— Virender Sehwag (@virendersehwag) December 9, 2020
बीसीसीआयने सुद्धा आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून पार्थिव पटेलला निवृत्तीच्या शुभेच्छा देताना लिहले, “पार्थिव सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा”.
Happy retirement Parthiv
As @parthiv9 announces retirement from all forms of cricket, we look back at some of the highlights from his cricketing career.
WATCH – https://t.co/Z33ZNZ1UnS pic.twitter.com/6MQovpa9Hs
— BCCI (@BCCI) December 9, 2020
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सुद्धा ट्विट करताना लिहले, “पार्थिवचे खेळासाठी शानदार योगदान राहिले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचे कारनामे प्रसिद्ध आहेत. गुजरातला पहिला रणजी करंडक जिंकून देणे हा त्याच्या कारकिर्दीतील शानदार क्षणापैकी एक आहे. मी त्याच्या दुसर्या डावासाठी शुभेच्छा देतो.”
Parthiv's contribution to the game has been tremendous. His exploits in domestic cricket are well-known. Leading Gujarat to a maiden Ranji Trophy triumph is one of the highlights of his illustrious career. I wish him good luck for his second innings. @BCCI @parthiv9
— Jay Shah (@JayShah) December 9, 2020
आर. पी. सिंग याने सुद्धा ट्विटरवर प्रतिक्रिया देताना लिहले,” दमदार कारकिर्दीसाठी अभिनंदन भावा. तुम्ही तुमच्या मागे जो वारसा सोडत आहात त्याला गुजरात क्रिकेट नेहमी लक्षात ठेवेल. तुमच्या नेतृत्वाखाली खेळणे खुप चांगले होते. युवा पिढीला प्रेरित करत राहिला आणि त्यांना दाखवून दिले वय फक्त एक आकडा आहे”
Congratulations on a wonderful career brother. The legacy which you are leaving behind in Gujarat cricket will forever be remembered. It was great playing with you Captain. Keep inspiring the younger generations and showing them how age (young and old) is just a number. Cont.. pic.twitter.com/wly2V0i8Cb
— R P Singh रुद्र प्रताप सिंह (@rpsingh) December 9, 2020
युसूफ पठाण याने ही ट्विट करताना लिहले, “तुम्हाला तुमच्या दमदार कारकिर्दीसाठी अभिनंदन . तुमच्या मोठ्या कारकिर्दीत अविस्मरणीय क्षण आहेत. तुम्हाला दुसर्या डावासाठी शुभेच्छा. हॅप्पी रिटायरमेंट. ”
Congratulations on your wonderful career @parthiv9 . Many moments to cherish in your long career. Wishing you all the best for your 2nd innings. Happy retirement. #ParthivPatel pic.twitter.com/2nFHhxWHOe
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) December 9, 2020
जतिन सप्रू यांनी ही ट्विट करताना लिहले, “तुम्हाला तुमच्या शानदार कारकिर्दी आणि प्रवासासाठी अभिनंदन आणि पुढील डावासाठी शुभेच्छा. ”
Congratulations on a wonderful career and journey @parthiv9 Best Wishes for the next innings 🙌🏻 https://t.co/I3jVd6Si5h
— Jatin Sapru (@jatinsapru) December 9, 2020
संबंधित बातम्या:
– बिग ब्रेकिंग! भारताचा दिग्गज खेळाडू पार्थिव पटेल याची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती
– अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात
– अठरा वर्षांची छोटीशी क्रिकेट कारकीर्द खेळलेला पार्थिव पटेल