---Advertisement---

भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत मॉर्गन घालतोय सातत्याने दोन टोप्या, ‘हे’ आहे कारण

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान अहमदाबाद येथे पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जातेय. पहिल्या चार सामन्यानंतर दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकल्याने मालिकेत २-२ अशी बरोबरी झाली आहे. मात्र, या सर्व सामन्यांमध्ये इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन सातत्याने आपल्या डोक्यावर दोन टोप्या घातलेला दिसून येत आहे. त्याचे अशाप्रकारे दोन टोप्या घालण्याचे कारण काय हे आपण जाणून घेऊया.

हे आहे कारण
इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन प्रत्येक सामन्यावेळी वारंवार डोक्यावर दोन टोप्या घालून क्षेत्ररक्षण करत असतो. मात्र, यासाठी जबाबदार आहे आयसीसीचा नवा नियम. सध्या जगभरात कोरोना या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव पसरला आहे. त्यामुळे, आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी एक नवी नियमावली घालून दिली आहे. त्यानुसार, कोणताही खेळाडू आपली कोणतीही वस्तू फलंदाजांकडे देऊ शकत नाही. त्याला आपल्या वस्तूची जबाबदारी स्वतः घ्यावी लागेल.

अशावेळी, क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघातील खेळाडू आपली टोपी किंवा टॉवेल यासारख्या वस्तू पंचांकडे न देता आपल्या कर्णधाराकडे किंवा सहकारी खेळाडूकडे देतात. सर्व खेळाडू एकाच बायो बबलमध्ये राहत असल्याने त्याची परवानगी आयसीसीने त्यांना दिली आहे. याच कारणाने, इंग्लंडचे गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजीला येतात, त्यावेळी ते आपली टोपी मॉर्गनच्या हवाली करतात.

शाहिद आफ्रिदीने नोंदवलेला आक्षेप
पाकिस्तानचा माजी दिग्गज अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान सुपर लीगच्या सहाव्या हंगामा दरम्यान या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता. तो ज्यावेळी गोलंदाजी करायला आला, त्यावेळी त्याने पंचांकडे आपली टोपी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचांनी त्यास नकार दिला होता.

त्यानंतर, आफ्रिदीने ट्विट करत लिहिले होते, ‘सर्व खेळाडू पंच आणि कर्मचारी एकाच बायोबबलमध्ये राहत असताना, पंचांकडे खेळाडूंच्या वस्तू का देण्यात येत नाहीत.’ आफ्रिदीच्या या भूमिकेवर अनेक खेळाडूंनी त्याचे समर्थन केले होते.

भारत-इंग्लंड मालिकेत प्रेक्षकांना येण्यास बंदी
भारतामध्ये कोरोना महामारीची दुसरी लाट आल्याने बीसीसीआय व आयसीसीने भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यानंतर उर्वरित मालिकेत प्रेक्षकांना मैदानावर येण्यास बंदी केली आहे. या टी२० मालिकेनंतर होणारी वनडे मालिका देखील विनाप्रेक्षक बंद दाराआड खेळविले जातील.

महत्त्वाच्या बातम्या –

“तुमच्याकडे प्लॅन-बी नव्हता का?” पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भडकला आफ्रिदी

सूर्यकुमारच्या नावे जमा झाला खास विक्रम; रोहित-रहाणेच्या पंक्तीत मिळवले स्थान

‘त्या’ खेळाडूचे पुनरागमन होताच भारतीय संघ आणखी मजबूत होईल, बॉलिवूड अभिनेत्याचा दावा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---