मुंबई | स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताच त्याच्या जर्सी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
हार्दिक 228 क्रमांकाची जर्सी घालून खेळत होता. त्यावेळी अनेकांना हा प्रश्न पडला की 228 क्रमांकाची जर्सी घालून तो का खेळतो? गुरुवारी आयसीसीने क्रिकेट फॅन्सला पंड्या 228या क्रमांकाची जर्सी घालून का खेळतो? असे ट्विट करून प्रश्न विचारले तेव्हा या पाठीमागचे गुपित अकरा वर्षांनंतर उलगडले.
क्रिकेटमधील प्रसिद्ध स्टॅटिशियन मोहनदास मेनन यांनी आयसीसीच्या या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. हार्दिक पंड्या सोळा वर्षांखालील बडोदा संघाचा नेतृत्व करत होता. त्या मुंबईच्या संघाविरुद्ध विजय मर्चंट चषकामध्ये खेळताना द्विशतक ठोकले होते. या सामन्यात त्याने 228 धावांची बहारदार खेळी केली होती. रिलायन्स क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हार्दिकने त्याच्या कारकिर्दीमधले पहिलेच द्विशतक ठोकले होते.
Hardik Pandya's only double century of his career (so far!) .. 228 (run out) for Baroda U16 against Mumbai U16 at Reliance Cricket Stadium, Nagothane on 9/10 Dec 2009 in the Vijay Merchant U16 Trophy tournament 2009/10. He was captain then!
— Mohandas Menon (@mohanstatsman) May 21, 2020
2009 साली झालेल्या या सामन्यात बडोद्याचा संघ अडचणीत सापडला होता. अवघ्या 60 धावात 4 गडी बाद झाले होते. तेव्हा पंड्या मैदानावर उतरून 8 तास खेळपट्टीवर तळ ठोकून 391 चेंडूत 228 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. या खेळीने हार्दिक रातोरात स्टार झाला. तसेच त्याने मुंबईच्या पहिल्या डावात भेदक गोलंदाजी करत पाच फलंदाजांनाही बाद केले होते. या खेळीने हार्दिकच्या कारकिर्दीला एक वेगळे वळण लागले. तो अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला. तेव्हापासून हार्दिक या क्रमांकाची जर्सी घालून क्रिकेट खेळत होता
परंतु अचानक न्यूमरोलॉजिस्ट सांगण्यावरून 2016 साली पंड्याने 33 क्रमांकाची जर्सी घालून क्रिकेटमध्ये खेळणे सुरू केले. भारतीय संघातील सर्वच खेळाडू आकड्यांवर ती खूप विश्वास ठेवतात. महेंद्रसिंग सात क्रमांक लकी आहे तर विराट कोहली अठरा नंबरची जर्सी घालून क्रिकेट खेळतो. रोहित शर्मा 45 क्रमांकाची तर सेहवाग 44 या क्रमांकाची जर्सी घालून क्रिकेट खेळत होते त्यानंतर वीरेंद्र सेहवागने विदाऊट नंबरच्या जर्सी घालून मैदानात उतरू लागला.