---Advertisement---

Video : धोनीने रोहित शर्माला म्हटले ‘लोभी’, पाहा काय आहे नक्की प्रकरण

On: सोमवार, मार्च 15, 2021 1:45 AM
---Advertisement---

येत्या ९ एप्रिल पासून इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी माजी कर्णधार एमएस धोनीचा नवीन लूक साकारल्याचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने मुंडण केले आहे. तसेच भिक्षुचा अवतार साकारला आहे. यावरून अनेकांनी तर्क वितर्क लावायला सुरुवात केली होती. याचे खरे कारण आता समोर आले आहे.

धोनीने हा लुक आयपीएल २०२१ च्या एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी केला आहे.या जाहिरातीत तो रोहितला ‘लोभी’ असेही म्हणत आहे.

या जाहिरातीत धोनी लहान मुलांना रोहित शर्माबद्दल गोष्ट सांगताना दिसून येत आहे. त्याने या जाहिरातीसाठी मुंडण आणि भिक्षूचा लुक साकारला होता. तो या जाहिरातीमध्ये म्हणतोय,”आजचा विषय आहे लोभ. ही गोष्ट आहे, हिटमॅन रोहित शर्माची. एक वेळा सिहांच्या तोंडाला रक्त लागले आणि पाच वेळेस जिंकून देखील त्याचे पोट नाही भरले. विवो आयपीएलमध्ये भारताचा नवीन मंत्र आहे. जर लोभीपणाने जिंकण्याची भूक वाढत असेल तर लोभी असणे कुल आहे. त्यानंतर धोनीला लहान मुलगा विचारतो की, हिटमॅन हॅट्रिक करणार का? यावर धोनी म्हणतो -हे तर वेळच सांगेल.’

रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार

मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस जेतेपद मिळवून दिले आहे. आयपीएल २०२० मध्ये मुंबई संघाने दिल्ली संघाला पराभूत करत ५ वे जेतेपद पटकावले होते. येत्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघ ६ वे जेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल.

महत्त्वाच्या बातम्या –

Video: अरेरे, भावा चेंडू तरी नीट पकडायचा! बेन स्टोक्सने ‘असा’ सोडला इशानचा सोपा झेल

इशान किशनने अर्धशतकासह पदार्पण गाजवले! ‘असा’ कारनामा करणारा रहाणेनंतरचा ठरला दुसराच भारतीय

रिषभ पंत रिव्ह्यू सिस्टीम ऍक्टिवेट! अचूक निर्णय घेत डेविड मलानचा अडथळा केला दूर, बघा व्हिडिओ    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---