मुंबई| इंडियन प्रीमियर लीग २०२२ चे बिगूल वाजले असून २६ मार्च रोजी हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याची सुरुवात होईल. तत्पूर्वी आयपीएल चाहत्यांना उद्घाटन सोहळ्याची उणीव जाणवत असेल. पण आयपीएल २०२२ पूर्वी उद्घाटन सोहळा न होण्यामागचे कारण काय आहे, हे जाणून घेऊ.
३ वर्षांपूर्वी अर्थात आयपीएलच्या (Indian Premier League) बाराव्या हंगामापूर्वी (१४ फेब्रुवारी २०१९) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात एकूण ४० भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्या शहीद जवानांच्या सन्मानार्थ आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला होता. हाच आयपीएलमधील शेवटचा उद्घाटन सोहळा ठरला होता.
VIVO #IPL Opening Ceremony: The stage is getting set for season 11 opener – @mipaltan vs. @ChennaiIPL #MIvCSK pic.twitter.com/1nHheHg4aw
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2018
कारण त्यापुढील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे उद्घाटन सोहळा (IPL Opening Ceremony) आयोजला गेला नव्हता. त्यानंतर आयपीएल २०२१ मध्येही कोरोनामुळे उद्घाटन समारंभ होऊ शकला नव्हता. मात्र आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये ही कसर भरून काढत भव्यदिव्य उद्घाटन समारंभ होईल, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र कोरोनाचा प्रभाव थोड्याफार प्रमाणात कमी झाला असला तरीही उद्घाटन समारंभ न आयोजण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याने यंदाची चाहत्यांना त्याचा आनंद लुटता येणार नाही.
बीसीसीआयने पूर्णपणे बंद केलाय उद्घाटन सोहळा
खरे तर, उद्घाटन सोहळ्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होत असल्याने बीसीसीआय हा सोहळा टाळण्यासाठी प्रयत्नशील होते. २०१९ मध्ये उद्घाटन सोहळ्यासंदर्भात बीसीसीआयने आयपीएल गव्हर्निंग काउंसिलला म्हटले होते की, यामध्ये फार पैसा वाया जातो. चाहत्यांची उत्सुकता आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात नसून ती खेळाडूंच्या प्रदर्शनावर असते. उद्घाटन सोहळ्यासाठी बोर्डाला मोठमोठ्या स्टार्सवर प्रचंड पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यात पैशांची नासाडी होते. चाहत्यांना तर या मध्ये तिळभरही रस नसतो. आता कोरोनामुळेच का होईना पण बीसीसीआयचा हा हेतू पूर्ण झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जॉब डन’ म्हणत जेव्हा धोनीने २०२१मध्येच दिले होते सीएसकेचे नेतृत्त्व सोडण्याचे संकेत, पाहा Video
IPL2022| चेन्नई वि. कोलकाता सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
हे काय? यष्ट्यांवर बेल्स नसतानाच खेळवला गेला विश्वचषक सामना, जाणून घ्या असे करण्यामागचे कारण