---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकांसाठी जडेजाला का मिळाले नाही टीम इंडियात स्थान? बीसीसीआयचा खुलासा

On: गुरूवार, जानेवारी 27, 2022 1:52 PM
Ravindra Jadeja and Rohit Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) (BCCI) आणि निवड समितीने वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या (India vs West Indies) वनडे आणि टी२० मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंची घोषणा केली आहे. या संघात रोहित शर्माचे (Rohit Sharma) पुनरागमन झाले आहे. तो पहिल्यांदाच पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे, तर केएल राहुल याकडे (Kl Rahul) या संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. परंतु, भारतीय संघातील मुख्य अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला (Ravindra Jadeja) या संघात स्थान देण्यात आले नाहीये. काय आहे यामागील खरे कारण, चला जाणून घेऊया.

काय आहे जडेजाला संघाबाहेर ठेवण्याचे कारण?
भारतीय संघाचा मुख्य अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाहीये. रवींद्र जडेजा पूर्णपणे फिट नाहीये, याच कारणास्तव निवड समितीने त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील जाता आले नव्हते.

बीसीसीआयने याबाबत बोलताना म्हटले की, “जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे, तर केएल राहुल दुसऱ्या वनडे सामन्यापासून उपलब्ध राहणार आहे. जडेजा गुडघ्याच्या दुखापतीतून सावरण्याच्या अंतिम टप्प्यात असून तो या मालिकेला मुकणार आहे.”

बीसीसीआय रवींद्र जडेजाबाबत कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्याचा विचार करत नाहीये. बीसीसीआयचे स्पष्ट मत आहे की, तो पूर्णपणे फिट झाल्यानंतर संघात पुनरागमन करेल. कारण तो संघातील मुख्य खेळाडू आहे. येत्या काही महिन्यात भारतीय संघाला टी२० विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. त्याने शेवटचा सामना नोव्हेंबर २०२१ मध्ये खेळला होता.

असा आहे वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

असा आहे टी२० मालिकेसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.

महत्वाच्या बातम्या :

भारतीय संघातील ३ न्यू कमर्स, ज्यांना मिळू शकते वनडे पदार्पण करण्याची संधी

वाढदिवस विशेष : क्रिकेटचा हॅरी पॉटर अर्थात न्यूझीलंडचा फिरकीपटू ‘डॅनियल व्हेट्टोरी’; जाणून घ्या त्याचे खास विक्रम

हे नक्की पाहा:

आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय । Virat Touched Sachin's Feet

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---