जेव्हा-जेव्हा जगात दिग्गज सलामीवीरांची चर्चा होईल तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा नक्कीच उल्लेख करता येईल. गावसकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० कसोटी धावा पूर्ण करणारे पहिले फलंदाज होते. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर २९ शतके नोंदविणारे ते पहिले फलंदाज होते. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत ३४ शतके झळकावली. गावसकर हे दोन कसोटी मालिकेत ७०० पेक्षा जास्त धावा करणारे एकमेव भारतीय आहेत. असे अनेक विक्रम अजूनही त्यांच्या नावावर आहेत. मात्र, आपल्या कारकिर्दीत गावसकर यांनी कधीही हेल्मेट घातले नाही, यामागील कारणाचा गावसकर यांनी स्वतः उलगडा केला.
तुफानी गोलंदाजांचा केला सामना
गावसकर ज्या काळात क्रिकेट खेळले त्यावेळी अँडी रॉबर्ट्स, मायकेल होल्डिंग, माल्कम मार्शल, रिचर्ड हॅडली, डेनिस लिली असे गोलंदाज होते. जे आपल्या तुफानी वेगासाठी ओळखले जात. असे असूनही गावसकर यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत हेल्मेट कधीच घातले नव्हते. मात्र, एकदा मार्शल यांचा चेंडू त्यांच्या कपाळावर आदळला. यानंतर, त्यांनी काही काळ स्कल कॅप घातली. आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या काही वर्षांत त्यांनी ते घालणेही बंद केले.
म्हणून गावसकर घालत नसे हेल्मेट
अभिनेता गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चँपियन्स’ या कार्यक्रमात गावसकरांनी हेल्मेट न घालण्याचे कारण उघड केले होते. त्यांनी विनोदपूर्वक सांगितले की, “माझ्या डोक्यात काही नाहीच मग हेल्मेट कशाचे संरक्षित करीन. मात्र, खरे सांगायचे झाल्यास, मला कधी वाटलेच नाही की मी हेल्मेट घालावे. माझ्याकडे स्कल कॅप होती मात्र ती तीन वर्ष किट बॅगमध्ये पडून होती.”
या मुलाखतीत त्यांनी त्या खेळाडूचाही खुलासा केला होता, जो त्यांना वारंवार हेल्मेट घालण्याचा सल्ला देत असे. गावसकर आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्या दरम्यान खूप मैत्री होती. म्हणूनच अनेक वेळा इम्रान हे गावसकर यांना हेल्मेट घालण्याचा सल्लाही देत. परंतु, गावसकर यांनी आपल्या मित्राच्या सल्ल्याचे पालन कधीही केले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
सचिन म्हणतो; त्यांना वयाच्या १३व्या वर्षी पाहिले, तेव्हा विश्वास बसत नव्हता!
बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरेलल्या विराटने क्षेत्ररक्षण करताना लुटली मैफील, पाहा भन्नाट व्हिडिओ
दुसऱ्या टी२० सामन्यात सामनावीर ठरलेल्या भुवीने दिलीये थेट कपिल देवला टक्कर! जाणून घ्या विक्रम