इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम नुकताच संपला आहे. तब्बल १४ वर्षांनंतर राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यास यशस्वी ठरला होता. याआधी २००८ साली आयपीएलच्या पहिल्याच हंगामात राजस्थानच्या संघाने दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यावेळी राजस्थानने चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत आयपीएलचे पहिले विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र राजस्थानच्या नशिबी केवळ चषकांचा दुष्काळच राहिला. आयपीएल जिंकणे दूरच मात्र १४ हंगामात राजस्थान प्लेऑफमध्येही पोहोचू शकले नाही. यावर्षी मात्र संजूने हा दुष्काळ मोडण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली, पण त्याला अपयश आले. या अपयशामागे प्रामुख्याने पाच कारणे असू शकतात.
१. प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकला
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) या मुख्य सामन्यात नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु गुजरातच्या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. शिवाय आत्तापर्यंत या हंगामात अनेकदा कर्णधारांनी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत सामना जिंकला आहे. संजूने मात्र विरुद्ध निर्णय घेत गुजरातवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण संजूचा हा डाव त्याच्याच अंगावर उलटला.
२. सलामीवीरांची मंद खेळी
राजस्थान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हा जलद सुरुवात करण्याची आवश्यकता होती. मात्र, राजस्थानचे सलामीवीर जोस बटलर (Jos Buttler) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi jaiswal) असे करण्यास अयशस्वी ठरले. त्यामुळे गुजरातला डावा अखेरीस केवळ १३१ धावांचे लक्ष्य मिळाले. हे लक्ष्य गुजरातच्या फलंदाजांनी अगदी सोप्या रीतीने साध्य केले.
३. मोठी खेळी करण्यास बटलर अपयशी
अंतिम सामन्यापर्यंत पोहोचणाऱ्या राजस्थानची दुरा यंदाच्या वर्षी ऑरेंज कॅप आपल्या नावे करणाऱ्या जॉस बटलरच्या हाती होती. मात्र, अंतिम सामन्यात आपली चमक दाखवत मोठी खेळी करण्यास जॉस अपयशी ठरला. त्यामुळे राजस्थान धावफलकावर मोठी संख्या उभारू शकला नाही.
४. मधल्या फळीचा फ्लॉप शो
यंदाच्या संपूर्ण हंगामात शिमरन हेटमायर (Shimron Hetmayer) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी राजस्थानसाठी फिनिशरची भूमिका रेखाटली होती. मात्र, अंतिम सामन्यात डावाचा शेवट गोड करण्यास दोघेही अपयशी ठरले. त्यामुळे राजस्थानला मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आले.
५. राशिद खानचे उत्तर शोधण्यास असमर्थ
संपूर्ण सामन्यात फलंदाजी करत असताना राजस्थानसमोर सर्वात मोठे आवाहन होते, ते म्हणजे गुजरातचा फिरकीपटू राशिद खान (Rashid khan) याचे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने योग्य वेळी राशिदच्या हातात चेंडू देत त्याला गोलंदाजीसाठी बोलावले. राशिदविरुद्ध जास्त दावा काढण्यास राजस्थानचे फलंदाज अपयशी ठरल्याने फलंदाजांवर दबाव वाढत गेला. त्यामुळेच सातत्याने राजस्थानच्या विकेट्स ढासळत राहिल्या.
या पाच कारणांमुळे राजस्थानला गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागला. तसेच, १४ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम सामन्यात येऊन देखील ट्रॉफीवर पाणी सोडावे लागले.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राशिद खानची मोठी भविष्यवाणी! ‘हा’ खेळाडू क्रिकेटविश्वात होईल खूप यशस्वी
कर्णधार हार्दिकचेही मास्टर धोनीच्या पावलावर पाऊल, ट्रॉफी जिंकल्यानंतर केले ‘हे’ कौतुकास्पद काम
महाराष्ट्राच्या पैलवानांचा नादच खुळा! इतिहासात पहिल्यांदाच केली ‘ही’ खास कामगिरी