Loading...

‘डुबकी किंग’ परदीप नरवालच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमात काल(7 ऑगस्ट) 30 वा सामना पटना पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्स संघात पार पडला. या सामन्यात पटनाला 26-35 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. असे असले तरी पटना पायरेट्सचा कर्णधार परदीप नरवालने प्रो कबड्डीमध्ये एक इतिहास रचला आहे.

त्याने या सामन्यात 14 रेड पॉइंट्स मिळवताना प्रो कबड्डीमध्ये 900 रेड पॉइंट्सचा टप्पाही पार केला आहे. प्रो कबड्डीमध्ये 900 रेड पॉइंट्सचा टप्पा पार करणारा तो पहिलाच कबड्डीपटू ठरला आहे. त्याचे आता प्रो कबड्डीमध्ये 91 सामन्यात 905 पॉइंट्स झाले आहेत.

त्याने हा पराक्रम पाटलीपुत्र इनडोअर स्टेडीयम, पटना या त्यांच्या घरच्या मैदानावर केला आहे. त्यामुळे या सामन्यात परदीपला सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडून मोठा पाठिंबा मिळत होता.

याबरोबरच डुबकी किंग अशी ओळख मिळवलेला परदीप हा प्रोकबड्डीमध्ये सर्वाधिक एकूण पॉइंट्स मिळवण्यामध्ये सध्या 912 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत 919 पॉइंट्ससह राहुल चौधरी अव्वल क्रमांकावर आहे.

प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक रेडींग पॉइंट्स मिळवणारे कबड्डीपटू – 

Loading...

905 – परदीप नरवाल (91 सामने)

864 – राहुल चौधरी (105 सामने)

752 – अजय ठाकूर (107 सामने)

751 – दीपक हुड्डा (108 सामने)

586 – रोहित कुमार (76 सामने)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

Loading...

आज विंडीज विरुद्ध भारत संघात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्याबद्दल सर्वकाही…

वाढदिवस विशेष: का देतो रॉजर फेडरर बॉलबॉयला पिझ्झा पार्टी?

वाढदिवस विशेष: फॅब-४ मधील केन विलियम्सनबद्दल माहित नसलेल्या या ५ गोष्टी

You might also like
Loading...