fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

वाढदिवस विशेष: का देतो रॉजर फेडरर बॉलबॉयला पिझ्झा पार्टी?

स्विझर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आज ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररचा जन्म स्विझर्लंडमधील बेसल येथे झाला. बेसल शहरात टेनिसमधील स्विस इनडोअर बेसल ही स्पर्धा होते.

विशेष म्हणजे या स्पर्धेत जेव्हाही फेडरर अंतिम सामना खेळतो तेव्हा तो बॉलबॉय आणि गर्ल यांना पिझ्झा पार्टी देतो. त्याने ही प्रथा जवळजवळ ११ वर्षांपासून कायम ठेवली आहे.

बेसल हे फेडररचे घरेलू मैदान आहे. या मैदानावरवर तो वयाच्या ११ व्या वर्षी बॉलबॉय होता. तेव्हा तो सायकलवर या मैदानावर यायचा. त्याचवेळेस या स्पर्धेतील ११९३ सालच्या अंतिम फेरीतील मिचेल स्टिच विरुद्ध स्टीफन एडबर्ग यांच्या सामन्यादरम्यानही तो बॉलबॉय होता.

त्यामुळे फेडरर म्हणतो,’ मी तेव्हाही बॉलबॉय होतो आणि मी कायमच असेल.’

त्यामुळेच फेडरर जेव्हाही इथे जिंकतो किंवा पराभूत होतो तेव्हा तो सगळ्या बॉलबॉय आणि गर्लला पिझ्झा पार्टी देतो आणि स्वतःसुद्धा या पार्टीत सामील होतो. ही पिझ्झा पार्टी म्हणजे त्या सगळ्या बॉलबॉय आणि गर्लसाठी एक आनंदाची पर्वणी असते. त्याचबरोबर फेडरर या बॉलबॉय आणि गर्ल यांना एक मेडलही देतो.

View this post on Instagram

Once a ball boy, always a ball boy

A post shared by Roger Federer (@rogerfederer) on

View this post on Instagram

Once a ball boy, always a ball boy.??#pizzaparty

A post shared by Roger Federer (@rogerfederer) on

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

वाढदिवस विशेष: फॅब-४ मधील केन विलियम्सनबद्दल माहित नसलेल्या या ५ गोष्टी

विंडीज विरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर रिषभ पंत म्हणाला…

सौरव गांगुली म्हणाला, ‘देवा भारतीय क्रिकेटची मदत कर’; जाणून घ्या कारण

You might also like