सध्या श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. गाले आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवरील या सामन्यात पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज सौद शकील याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो पाकिस्तानकडून श्रीलंकेत द्विशतक ठोकणारा पहिलाच फलंदाज बनला आहे. यापूर्वी पाकिस्तानी फलंदाजांनी श्रीलंकेत जाऊन कसोटीत द्विशतक करता आले नव्हते.
विशेष म्हणजे, सौद शकील (Saud Shakeel) हा पाकिस्तानकडून श्रीलंकेविरुद्ध द्विशतक ठोकणारा सातवा फलंदाज बनला आहे. त्याने ही कामगिरी अवघ्या सहाव्या सामन्यात त्याच्यापूर्वी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत द्विशतक करण्याचा पराक्रम जावेद मियांदाद, कासिम उमर, इजाज अहमद, इंझमाम उल हक, युनिस खान आणि तौफीक उमर यांनी केला होता. याव्यतिरिक्त सौद कसोटीत द्विशतक करणारा पाकिस्तानचा एकूण 23वा फलंदाज बनला आहे.
Pakistan's Saud Shakeel has made a dream start to his Test career 🔥
More ➡️ https://t.co/WCm5YkFjOh pic.twitter.com/OxYIluVZ8i
— ICC (@ICC) July 19, 2023
शकीलचे प्रदर्शन
शकील याने पाकिस्तानच्या पहिल्या डावात पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरून शेवटपर्यंत टिच्चून फलंदाजी केली. त्याने या डावात 361 चेंडूंचा सामना करताना नाबाद 208 धावा केल्या. या धावा करताना त्याने 19 चौकारांचाही पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त आघा सलमान यानेही 113 चेंडूत 83 धावांचे मोलाचे योगदान दिले. तसेच, शान मसूदने 39 आणि नौमन अलीने 26 धावा केल्या. या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 461 धावांचा डोंगर उभारला.
श्रीलंकेविरुद्ध कसोटीत द्विशतक करणारे पाकिस्तानी फलंदाज
जावेद मियांदाद, फैसलाबाद (1985)
क़ासिम उमर, फैसलाबाद (1985)
इजाज अहमद, ढाका (1999)
इंझमाम-उल-हक, ढाका (1999)
यूनिस खान, कराची (2009)
तौफीक उमर, अबू धाबी (2011)
सौद शकील, गाले- श्रीलंका (2023)*
श्रीलंका 135 धावांनी मागे
पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंका संघाने त्यांच्या दुसऱ्या डावात 14 धावा केल्या. अशाप्रकारे श्रीलंका संघ अजून 135 धावा मागे आहे. श्रीलंका संघाने पहिल्या डावात 312 धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून पहिल्या डावात धनंजय डी सिल्वा (Dhananjaya De Silva) याने शानदार शतक झळकावले होते. विशेष म्हणजे, तो त्याचा 50वा कसोटी सामना खेळत आहे आणि या खास सामन्यात त्याने शानदार शतक ठोकले. हे त्याचे कसोटीतील 10वे शतक होते. तसेच, 10 शतकांमधील पाकिस्तानविरुद्धचे त्याचे तिसरे शतक होते. (record cricketer saud shakeel first pakistan batter to score a test double century in sri lanka )
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे रँकिंगमधील नंबर 1 नॅटचा विक्रमी तडाखा! कांगारूंविरुद्ध Century ठोकत केला मोठा रेकॉर्ड
भारताला विश्वचषक जिंकून देणारा असा खेळाडू, ज्याला कधीच मिळाले नाही कामगिरीचे श्रेय