जगातील दिग्गज फिरकीपटूंच्या यादीत गणला जाणारा भारतीय संघाचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन पुन्हा चमकला. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात संघाबाहेर काढलेल्या अश्विनने वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात विंडसर पार्क येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात सिंहगर्जना केली. यावेळी शानदार गोलंदाजी करत अश्विनने 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, या विकेट्स घेताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचाही विक्रम मोडीत काढला आहे. चला तर अश्विनच्या विक्रमाविषयी जाणून घेऊयात…
अश्विनचा विक्रम
झाले असे की, आर अश्विन (R Ashwin) याने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. यासह त्याने कसोटी कारकीर्दीतील 33वे विकेट्सचे पंचक पूर्ण केले. विशेष म्हणजे, अश्विन सक्रिय खेळाडूंच्या यादीत एका डावात सर्वाधिक वेळा 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. यामध्ये त्याने ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेचा भाग असलेल्या जेम्स अँडरसन (James Anderson) याचाही विक्रम मोडून टाकला आहे.
अश्विनचे हे कसोटीतील 33वे विकेट्सचे पंचक आहे, त्याने सक्रिय गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी 32 वेळा करणाऱ्या अँडरसनला पछाडले आहे. अश्विनने ही कामगिरी करण्यासाठी फक्त 131 डावांचा आधार घेतला आहे, तर अँडरसनने आतापर्यंत 253 डाव खेळले आहेत.
3⃣3⃣rd five-wicket haul in Tests! ???? ????@ashwinravi99 makes merry in Dominica & how! ???? ????
Scorecard ▶️ https://t.co/FWI05P4Bnd #TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/H3y1wH2czp
— BCCI (@BCCI) July 12, 2023
दुसरीकडे, डावात सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणाऱ्या सर्वकालीन गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर यादीत अश्विन सातव्या स्थानी पोहोचला आहे. कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) याच्या नावावर आहे. त्याने कारकीर्दीत 67 वेळा ही कामगिरी केली आहे. तसेच, या यादीत टॉप 7मध्ये सामील होणारा अश्विन दुसरा भारतीय आहे. त्याच्या पुढे भारतीय दिग्गज अनिल कुंबळे (Anil Kumble) असून त्याने कसोटीत 35 वेळा ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, अश्विनने 5 विकेट्स घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 700 विकेट्सचा टप्पाही पार केला आहे.
कसोटी डावात सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारे गोलंदाज
67- मुथय्या मुरलीधरन
37- शेन वॉर्न
36- रिचर्ड हॅडली
35- अनिल कुंबळे
34- रंगना हेरथ
33- आर अश्विन*
32- जेम्स अँडरसन
अश्विनचा असाही विक्रम
अश्विनच्या नावावर हे कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्धचे विकेट्सचे 5वे पंचक आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 वेळा, इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध 6 वेळा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 वेळा, श्रीलंकेविरुद्ध 3 वेळा, तसेच बांगलादेशविरुद्ध 1 वेळा असा पराक्रम केला आहे. (record holder Spinner ravichandran ashwin become most five wicket hauls among active players in tests beat james anderson wi vs ind)
कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध अश्विनचे विकेट्सचे पंचक
7 वेळा- ऑस्ट्रेलिया
6 वेळा- इंग्लंड
6 वेळा- न्यूझीलंड
5 वेळा- वेस्ट इंडिज*
5 वेळा- दक्षिण आफ्रिका
3 वेळा- श्रीलंका
1 वेळा- बांगलादेश
महत्वाच्या बातम्या-
Video- जीवाची पर्वा न करता सिराजने डाईव्ह मारत पकडला अद्भुत कॅच, 140 कोटी भारतीयांना वाटेल अभिमान
रोहितच्या एकाच निर्णयामुळे ‘या’ खेळाडूचं करिअर उद्ध्वस्त? 2 वर्षांनी केलं होतं कमबॅक