---Advertisement---

भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते पथिरानाने अवघ्या 20व्या वयात करून दाखवलं, बांगलादेशविरुद्ध घडला मोठा विक्रम

Matheesha-Pathirana
---Advertisement---

श्रीलंकेचा युवा खेळाडू मथीशा पथिराना हा आशिया चषक 2023 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चमकला आहे. पथिराना याने बांगलादेश संघाच्या फलंदाजांविरुद्ध भेदक गोलंदाजी करत खास पराक्रम आपल्या नावावर केला आहे. तो अशी कामगिरी करणारा श्रीलंकेचा युवा खेळाडू बनला आहे. चला तर, पथिराना याने कोणता विक्रम केला आहे, ते पाहूयात…

मथीशा पथिरानाचा विक्रम
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (Bangladesh vs Sri Lanka) संघात खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय श्रीलंकेच्या गोलंदाजांनी प्राथमिकरीत्या स्पष्टपणे चुकीचा ठरवला. यावेळी बांगलादेश संघ 42.4 षटकात अवघ्या 164 धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशच्या 10पैकी 4 विकेट्स या एकट्या मथीशा पथिराना (Matheesha Pathirana) याने घेतल्या. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.

https://twitter.com/OfficialSLC/status/1697247507909345588

पथिराना कमी वयात वनडे क्रिकेटमध्ये एका सामन्यात 4 विकेट्स घेणारा श्रीलंकेचा सर्वात युवा गोलंदाज बनला. त्याने 20 वर्षे आणि 256 दिवसांच्या वयात हा कारनामा करून दाखवला. यादीत दुसऱ्या स्थानी चमिंडा वास असून त्याने 1994मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 20 वर्षे आणि 280 दिवसांच्या वयात 4 विकेट्स घेतल्या होत्या. तिसऱ्या स्थानी कौशिक अमलीन असून त्याने 1986मध्ये 20 वर्षे आणि 364 दिवसांच्या वयात पाकिस्तानविरुद्ध 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

याव्यतिरिक्त यादीत चौथ्या स्थानी रमेश रत्नायके असून त्याने 1985मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 21 वर्षे आणि 17 दिवसांच्या वयात अशी कामगिरी केली होती. तसेच, यादीत पाचव्या स्थानी असलेल्या महीश थीक्षणा याने 2021मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 21 वर्षे आणि 37 दिवसांच्या वयात हा पराक्रम केला होता.

मथीशाची सामन्यातील कामगिरी
मथीशाने या सामन्यात 7.4 षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने फक्त 32 धावा खर्च करत सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या. या विकेट्समध्ये शाकिब अल हसन (5), मुशफिकुर रहीम (13), तस्किन अहमद (0) आणि मुस्तफिजूर रहमान (0) यांचा समावेश होता.

कमी वयात वनडेत एका डावात चार विकेट्स घेणारे श्रीलंकन गोलंदाज
20 वर्षे आणि 256 दिवस- मथीशा पथिराना, विरुद्ध- बांगलादेश (2023)*

20 वर्षे आणि 280 दिवसचमिंडा वास, विरुद्ध- झिम्बाब्वे (1994)
20 वर्षे आणि 364 दिवसकौशिक अमलीन, विरुद्ध- पाकिस्तान (1986)
21 वर्षे आणि 17 दिवसरमेश रत्नायके, विरुद्ध- ऑस्ट्रेलिया (1985)
21 वर्षे आणि 37 दिवसमहीश थीक्षणा, विरुद्ध- दक्षिण आफ्रिका (2021) (record Matheesha Pathirana Youngest Sri Lankan to bag a four-wicket haul in ODI)

हेही वाचाच-
ASIA CUP: पथिराना-थिक्षणापुढे बांगलादेशने टेकले गुडघे! श्रीलंकेसमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान
‘हे थोडे कठीण…’, रक्षाबंधनच्या खास क्षणी हळहळली शुबमनची बहीण; तुम्हीही व्हाल भावूक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---