---Advertisement---

जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडियाचा विजय ‘फिक्स’!; ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही असेच म्हणाल

On: रविवार, जानेवारी 2, 2022 3:29 PM
ind v sa
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (centurion ) मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. यासह कसोटी मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील पुढील सामना जोहान्सबर्गच्या (johansburg) मैदानावर पार पडणार आहे. चला तर पाहूया या मैदानावर भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना सोमवार पासून (३ जानेवारी ) सुरू होणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाने या मैदानावर अप्रतिम कामगिरी केली आहे. दोन्ही संघांमध्ये या मैदानावर ५ कसोटी सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाला २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर, ३ सामने अनिर्णीत राहिले आहेत.

तर दक्षिण आफ्रिका संघाने या मैदानावर आतापर्यंत एकूण ४२ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यापैकी १८ सामन्यात त्यांना विजय मिळवण्यात यश आले आहे. तर १३ कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच ११ कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत पहिला विजय २००६ मध्ये मिळवला होता. त्यावेळी राहुल द्रविड भारतीय संघाचा कर्णधार होता. तर भारतीय संघ जेव्हा २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. त्यावेळी भारतीय संघाने जोहान्सबर्गच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघावर विजय मिळवलेला. या सामन्यात भारतीय संघाने ६३ धावांनी विजय मिळवला होता. तरीदेखील भारतीय संघाला या मालिकेत १-२ ने पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारतीय संघाची जोहान्सबर्ग मधील कामगिरी (Indian Team Record at Johansburg)

२६ नोव्हेंबर, १९९३ – अनिर्णीत

१६ जानेवारी, १९९७ – अनिर्णीत

१५ डिसेंबर, २००६ – विजय

१८ डिसेंबर, २०१३ – अनिर्णीत

२४ जानेवारी, २०१८ – विजय

महत्वाच्या बातम्या :

माजी क्रिकेटपटू म्हणतोय, “निवडसमितीने विराट-रोहित वादाच्या आगीत तेल ओतले”

अय्यर-सिराजचे ‘झिंगाट’ थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन; पाहा मजेदार व्हिडिओ

हे नक्की पाहा:

क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार | Explanation Of Duck In Cricket And Its Type

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---