काल झालेल्या मॅन्चेस्टर डार्बी मध्ये सिटीने १-२ असा युनाएटेडचा धुव्वा उडवला. या विजयासह सिटीने गुणतालीकेत ११ गुणांची भव्य आघाडी घेतली आहे. १६ सामन्यात १५ विजयांसह ४६ गुण घेऊन सिटी लीग मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
त्याचबरोबर १६ सामन्यात ११ विजय मिळवून युनाएटेड ३५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तब्बल ४० सामन्यांनंतर आणि ४०० दिवसानंतर युनाएटेडचा घरच्या मैदानावर पराभव झाला आहे तर सिटीने लागोपाठ १४ सामन्यात विजय मिळवत नविन विक्रम प्रस्थापित केला.
सिटीने सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून सामन्यावर ताबा ठेवला. पहिला हाफ फक्त सिटीच आक्रमण करत होती पण त्यांना मिळालेल्या संधींचे गोल मध्ये रुपांतर करण्यात अपयश येत होते. ४३ व्या मिनिटला सिटीच्या सानेने मारलेला बाॅल युनाएटेडच्या गोलकीपर डीगेने अप्रतिम रित्या वाचवला आणि सिटीला काॅर्नर मिळाला.
मिळालेल्या संधीचे सोने करत डेविड सिल्वाने सामन्यातला पहिला गोल करत सिटीला ०-१ अशी बढत मिळवून दिली. पहिल्या हाफच्या ४ मिनिटच्या अतिरिक्त वेळेत सिटीच्या फॅबियन डेल्फच्या डिफेंड करतानाच्या चुकीचा फायदा घेत रॅशफोर्डने गोल करत पहिल्या हाफच्या शेवट युनाएटेडला १-१ ने बरोबरी साधून दिली.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीपासून सिटीने पुन्हा एकदा आक्रमण चालु केले. ५३ व्या मिनिटाला सिटीला मिळालेली फ्रीकीक लुकाकुने गोल पोस्ट जवळ अडवत बाॅल परत पाठवला पण तो युनाएटेडच्या खेळाडूला लागून ओटामेंडीच्या ताब्यात आला आणि त्याने त्याचे गोल मध्ये रुपांतर करुन सिटीला १-२ अशी अजेय बढत मिळवून दिली.
युनाएटेडच्या मॅनेजर जोसेचा हा सिटीचा मॅनेजर पेप समोर ९ वा पराभव होता. त्याने पेपपेक्षा जास्त सामने कोणत्याच मॅनेजर समोर गमावले नाहीत.
प्रिमियर लीगच्या इतर काही सामन्यांचे निकाल खालील प्रमाणे:-
वेस्ट हॅम १-० चेल्सी
स्पर्स ५-१ स्टोक सिटी
साऊथ्यॅम्पटन १-१ अर्सेनल
लीवरपुल १-१ एवरटाॅन
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)