भारत आणि झिम्बाब्वेत सुरू असलेल्या वनडे मालिकेत भारताने २-०ने विजयी आघाडी मिळवली आहे. या मासिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर झिम्बाब्वेला मालिका गमवावी लागली. यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार रेगिस चकाब्वा याने त्यांच्या संघाकडून झालेल्या चुकांची प्रांजळ कबूली देली.
यावेळी सामन्यात झिम्बाब्वे संघाकडून झालेल्य चूका उलघडताना चकाब्वा म्हणाला की,”आम्ही मैदानात खरोखरच चांगली लढत दिली. गेल्या काही सामन्यांमध्ये आम्ही लवकर विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला, पण आज आम्ही लवकर विकेट्स काढल्या. मात्र, शेवटी आमची शिस्त थोडी कमी पडली, आम्हाला आणखी धावा करायच्या होत्या.” अशा परीस्थितीत झिम्बाब्वे संघ आगामी वनडे सामन्यात आणखी चांगले प्रदर्शन करेल अशी आशा ही त्याने यावेळी व्यक्त केली.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलची लॉटरी! न्यूझीलंडविरुद्ध भूषवणार भारताचे नेतृत्त्वपद, विराटचा जोडीदारही खेळणार?
सीएसकेसाठी ट्रम्पकार्ड ठरलेल्या ‘मलिंगा’ला थेट आशिया चषकाचे तिकीट, भारतीय संघाचा काढणार घाम