आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत आणि अफगानिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण गेल्या २ सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर उपांत्य फेरीच्या शर्यतीत मजबूत दावेदार असलेल्या अफगानिस्तान संघासाठी देखील हा सामना तितकाच महत्त्वाचा असणार आहे.
नामिबिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगनिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगान याने निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अफगनिस्तान संघात त्याच्या जागी नव्या खेळाडूला संधी दिली जाणार आहे. कोण आहे तो खेळाडू? चला जाणून घेऊया.
पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर असगर अफगान याने निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली होती. नामिबिया संघाविरुद्धचा सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अफगनिस्तान संघात शराफुद्दीन अशरफ याला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे.
शराफुद्दीन अशरफ याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण ९ टी-२० सह २६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कोरोनाची भीती पाहता, शराफुद्दीन अशरफ अफगनिस्तान संघासोबतच होता. आता संधी मिळताच त्याला मुख्य संघात स्थान दिले गेले आहे.
Breaking: @sharafashraf82 has replaced @MAsgharAfghan in the Afghanistan squad for the T20WC2021. The decision was made following the retirement of Mr. Afghan, as he decided to quit international cricket after the Namibia game. pic.twitter.com/tWyAKjMo9S
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 2, 2021
शराफुद्दीन अशरफने या अष्टपैलू खेळाडूला टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत ५ गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच २०१५ मध्ये त्याने नेदरलँड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात त्याने ३ फलंदाजांना माघारी धाडले होते. तर शेवटचा सामना त्याने झिम्बाब्वे संघाविरुद्ध खेळला होता. जर ३ नोव्हेंबर रोजी भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी मुजीब उर रहमान फिट झाला नाही तर त्याच्याऐवजी शराफुद्दीन अशरफला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध अफगानिस्तान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
वैराहून माणुसकी जास्त मोठी! नामिबियाविरुद्ध बाबर आझमने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचं होतयं भरपूर कौतुक
सलग चौथ्या विजयासह पाकिस्तानने मिळवले उपांत्य फेरीचे तिकीट, दुसऱ्या स्थानासाठी ‘हे’ २ संघ शर्यतीत