भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या लग्नाच्या कारणामुळे चर्चेत आहे. सुरुवातीला बुमराह दाक्षिणात्य अभिनेत्री सोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा होती. मात्र त्या सर्व अफवा असल्याचे कळाल्यानंतर त्याचे नाव स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्याशी जोडले जात आहे. अशात बुमराह सोबत मुंबई इंडियन्समधील संघसहकारी सूर्यकुमार कुमारचे नाव समोर आले आहे. त्याने संजनाच्या जुन्या ट्विटवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्याची चर्चा चालू झाली आहे.
त्याचे झाले असे की, आयपीएल २०२० स्पर्धेला २ दिवस उरले असताना, संजना गणेशन हिने ट्विट केले होते. आपला एक फोटो शेअर करत तिने लिहिले होते की, ‘आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू खुलले आहे.’
या ट्विटवर मुंबई इंडियन्स संघातील बुमराहचा सहकारी खेळाडू सूर्यकुमार यादवने मजेशीर प्रतिक्रिया देत विचारले होते की, “तुम्ही कोणाच्या बाजूने आहात.” यापुढे त्याने हसायचा ईमोजी टाकला होता. यावर संजनाने “क्रिकेटच्या बाजूने आहे” अशी प्रतिक्रिया दिली होती.
या गोष्टीवरून चाहते वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत. अनेकांनी सूर्यकुमार यादवला बुमराह आणि संजनाच्या नात्यातील गोष्टीची पूर्वकल्पना होती, असे कयास लावले आहेत.
All smiles because it begins in TWO DAYS FROM NOWWW! 😁 @IPL pic.twitter.com/rrrKj4izEs
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) September 17, 2020
Cricket ki taraf se! 🏏
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) September 17, 2020
बुमराह येत्या १४ आणि १५ मार्चला संजना गणेशन हिच्यासोबत विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. त्यांचा विवाहसोहळा गोवामध्ये पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच चाहत्यांना हा प्रश्न पडला आहे की, या दोघांनी आपल्या नात्यामध्ये गोपनीयता कशी बनवून ठेवली. यापूर्वी ते कधीही एकमेकांसोबत दिसून आले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
वामिकाला २ महिने पूर्ण, विराट-अनुष्काने ‘खास’ अंदाजात केले सेलिब्रेशन; फोटो व्हायरल
मिताली राजचा ‘दशहजारी’ विक्रम! कोणत्याही भारतीय महिला खेळाडूला न जमलेला रेकॉर्ड केला नावावर
टी२० मालिका: पाहुण्यांना चारणार पराभवाची धूळ! ‘या’ भारतीय शिलेदारांवर असेल सर्वांची नजर