दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना चेंडू छेडछाड प्रकरणामुळे चांगलाच गाजत आहे. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण क्रिकेट वर्तुळात उमटले आहेत.
या प्रकरणात दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरॉन बॅनक्रोफ्ट या दोन खेळाडूंवर आयसीसीने कारवाई देखील केली आहे. या कारवाईमध्ये स्मिथला 100% दंड आणि एका सामन्याची बंदी तर बॅनक्रोफ्टला सामना फीच्या 75% दंड आणि 3 डिमेरिट पॉईंट्स देण्यात आले आहे.
आता काही मिडीया रिपोर्टनुसार स्टीव्ह स्मिथला एक वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते. तसेच त्याला आॅस्टेलिया संघाच्या कर्णधारपदावरून कायमचे काढले जावू शकते.
उपकर्णधार डेविड वार्नरवरही अशीच काही कारवाई होवू शकते तर संघाचा कोच डेरन लेहमनला लगेच राजीनामा द्यायला लागू शकतो.
आॅस्ट्रेलियामध्ये माध्यमांनी या घटनेमुळे संघावर सडकून टीका केली आहे. तसेच तेथील जनमाणसांत संघाबद्दलचा आदर कमी झाला आहे.
त्यामूळे अशी चुक करणाऱ्यांबद्दल आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड किती कठोर भूमिका घेते हे दाखवण्यासाठी या खेळाडूंवर कठोर कारवाई होणार आहे.