---Advertisement---

जुन्या फॉरमॅटची पुनर्रचना! यंदाची दिलीप ट्रॉफी ठरणार खूपच रोमांचक

On: शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025 5:11 PM
---Advertisement---

बीसीसीआय (BCCI) दरवर्षी दुलीप ट्रॉफीचे (Dulip trophy) आयोजन करते, ज्यामध्ये देशातील अनेक स्टार खेळाडू सहभागी होतात. दुलीप ट्रॉफी 2025 साठी बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर केले आहे. या वर्षी ही स्पर्धा इंटर झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. एकूण 6 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेला 28 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून, अंतिम सामना 15 सप्टेंबरपूर्वी खेळवला जाईल. लीग स्टेजमध्ये एकूण 5 सामने होतील आणि हे सामने नॉकआउट फॉरमॅटमध्ये खेळवले जातील.

पहिला सामना 28 ऑगस्टपासून नॉर्थ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात खेळवला जाईल. त्याच दिवशी दुसरा सामना सेंट्रल झोन आणि साऊथ झोन यांच्यात होणार आहे. हे दोन्ही सामने उपांत्यपूर्व फेरी म्हणजेच क्वार्टर फायनल अंतर्गत खेळवले जातील. पराभव झालेली टीम थेट स्पर्धेबाहेर पडेल. पहिला आणि दुसरा उपांत्य सामना 4 सप्टेंबरपासून खेळवला जाईल, तर अंतिम सामना 11 सप्टेंबरपासून होईल. यापूर्वी दिलीप ट्रॉफी ए, बी, सी आणि डी गटांमध्ये खेळवली जात होती, पण आता पुन्हा एकदा हा हंगाम झोनल फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.

दलीप ट्रॉफी 2025 मधील सर्व सामन्यांचं थेट प्रक्षेपण टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनलवर करण्यात येणार आहे. त्यासोबतच, तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवर जिओ हॉटस्टार अ‍ॅपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---