भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशात राजकिय संबंध चांगले नसल्याने त्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर पडत आहे. असे असले तरी ‘इंडो-पाक एक्सप्रेस’ या नावाने टेनिस जगतात ओळखली जाणारी रोहन बोपन्ना आणि ऐसम उल हक कुरेशी यांची जोडी तब्बल ७ वर्षांनंतर एटीपी ५०० मेक्सिको ओपन स्पर्धेत खेळण्यासाठी एकत्र आली होती. मात्र, त्यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
साल २०१४ नंतर भारताचा रोहन बोपन्ना आणि पाकिस्तानचा कुरेशी पहिल्यांदाच एकत्र खेळत होते. त्यांचा मेक्सिको ओपनमधील पहिल्या फेरीत दुसऱ्या मानांकित ब्रुनो सोरे आणि जॅमी मरे या जोडीशी सामना झाला. बोपन्ना आणि कुरेशीने सामन्याची सुरुवात चांगली केली होती. त्यांनी पहिला सेट ७-६(४) असा जिंकला होता.
मात्र, दुसऱ्या सेटमध्ये ब्रुनो आणि मरे यांच्या जोडीने बोपन्ना आणि कुरेशीवर वर्चस्व ठेवले. त्यांनी दुसरा सेट ६-२ असा जिंकला. त्यामुळे सामना सुपर टाय ब्रेकरमध्ये गेला. त्यात बोपन्ना आणि कुरेशीला १-१० असा पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्यांनी हा सामना ७-६(४),२-६ १-१० अशा फरकाने हरला.
सात वर्षांनंतर एकत्र आल्यानंतर बोपन्ना आणि कुरेशी या दोघांनीही म्हटले होते की राजकारण आणि खेळ या दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत. या दोघांनी यापूर्वी एकत्र खेळताना अनेक विजय मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सुमित नागलने नोंदवला कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय, अर्जेंटीना ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
युवा उद्योजक पुनीत बालन यांनी टेनिस प्रिमियर लीगमध्ये खरेदी केली ‘पुणे जग्वार्स’ टीम
जोकोविचच ‘अव्वल’! ३१० व्या आठड्यात पहिल्या क्रमांकावर कायम राहात फेडररच्या विश्वविक्रमाशी बरोबरी