आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक (icc under 19 world cup) स्पर्धेत रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेत युवा खेळाडूंचा जलवा सुरू आहे. या स्पर्धेत कॅनडा आणि इंग्लंड (Canada vs England) हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात इंग्लंडच्या एका युवा खेळाडूने असा काही हटके शॉट खेळला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील ग्रुप ए च्या सामन्यात इंग्लंड आणि कॅनडा संघ आमने सामने होते. या सामन्यात इंग्लंड संघाचा युवा फलंदाज जॉर्ज बेलने (George bell) एक अप्रतिम शॉट मारला, जे पाहून त्याला स्वतःला ही विश्वास बसत नव्हता. हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
तर झाले असे की, इंग्लंड संघाची फलंदाजी सुरू असताना, कॅनडा संघाकडून ४८ वे षटक टाकण्यासाठी फिरकीपटू गुरनेक जोहल सिंग गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचवा चेंडू गोलंदाजाने फुल टॉस चेंडू टाकला, ज्यावर उजव्या हाताचा फलंदाज जॉर्ज बेलने रिव्हर्स होऊन डाव्या हाताने लेग साईडच्या दिशेला थर्डमॅनच्या वरून षटकार मारला. या षटकारासह त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले.
हा शॉट मारल्यानंतर त्याची रिॲक्शन पाहण्यासारखी होती. त्याला स्वतःला विश्वास होत नव्हता. हा व्हिडिओ शेअर करत आयसीसीने लिहिले आहे की, “जॉर्ज बेलला विश्वास होत नाहीये की, त्याने आता काय केलं आहे.”
https://www.instagram.com/reel/CY4OggZl9Bj
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३२० धावा केल्या होत्या. यामध्ये टॉम प्रेस्टने सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली. तर जॉर्ज बेलने ५७ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना कॅनडा संघाचा डाव अवघ्या २१४ धावांवर संपुष्टात आला. हा सामना इंग्लंड संघाने १०६ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्वाच्या बातम्या:
ओडिशा एफसीने अखेर शोधला विजयाचा मार्ग; नॉर्थ ईस्टवर २-० ने मात
हे नक्की पाहा:






