---Advertisement---

भयंकर चिडलेल्या रोहित शर्माचा टीकाकार आणि माध्यमांवर पलटवार!

On: गुरूवार, जून 21, 2018 10:38 AM
---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची शुक्रवार दि.15 जून रोजी बेंगलोर येथिल राष्ट्रीय क्रिकेट आकादमीत यो-यो टेस्ट पार पडली होती.

पण रशिया येथे फिफा विश्वचषक पाहण्यासाठी गेलेला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा बीसीसीआयच्या परवानगीने या टेस्टसाठी अनुपस्थित राहिला होता.

त्यामुळे रोहित शर्माची यो-यो टेस्ट बुधवार दि.20 जूनला राष्ट्रीय क्रिकेट आकादमीत झाली.

यापूर्वी एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य अंबाती रायडू आणि भारतीय अ संघाचा सदस्य संजू सॅमसन यो-यो टेस्ट मध्ये फेल झाल्याने त्यांना संघातून डच्चू देण्यात आला होता.

याच पार्शभूमीवर आयपीयल पूर्वी झालेल्या यो-यो टेस्ट मध्ये रोहित शर्मा फेल झाला होता. त्यामुळे अनेकांना रोहित या यो-यो टेस्टमध्ये पास होईल का नाही याची शंका होती. तसेच रोहितच्या यो-यो टेस्ट संदर्भात क्रिकेट रसिकांबरोबरच अनेक प्रसार माध्यमातून उलट सुलट चर्चा सुरू होत्या. इतर खेळाडू यो यो टेस्ट देत असताना हा खेळाडू फूटबाॅल विश्वचषकाचे सामने पहलायला गेल्यामुळेही त्यावर टीका झाली होती. या चर्चांना काल शेवटी पूर्णविराम मिळाला.

काल दुपारी स्वत: रोहित शर्माने इंस्टाग्रामवरून तो यो-यो टेस्ट पास झाल्याची माहिती दिली.

 

https://www.instagram.com/p/BkPeOFOgDkL/?utm_source=ig_embed

 

तसेच रोहितवर सोशल मिडीया आणि प्रसार माध्यमातून होणाऱ्या टिकेला त्याने ट्वीटरवरून जोरदार प्रत्युत्तर दिले.

“मी माझा वेळ कुठे घालवतोय याचे तुमच्याशी काही देणे-घेणे नाही. आता आपण दुसऱ्या कोणत्यातरी महत्वाच्या विषयावर चर्चा करू. काही वृत्तवाहिन्यांच्या माहितीसाठी मला यो-यो टेस्टसाठी ही एकमेव संधी होती. कोणतेही वृत्तांकन करण्यापूर्वी त्याचे व्यवस्थित संशोधन करावे.”

3 जुलैपासून भारताचा आयर्लंड आणि इंग्लड दौरा सुरू होत आहे. यामधील मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी रोहित शर्माचा भारतीय संघात समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आयसीसी म्हणते; आम्हाला माफ करा; आमच्याकडून मोठी चूक घडली!

-महान फलंदाज माहेला जयवर्धने होणार पुन्हा कर्णधार!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment