---Advertisement---

‘या’ गोष्टीमुळे जसप्रीत बुमराहची कारकीर्द आहे धोक्यात, रिचर्ड हॅडली यांचा इशारा

On: मंगळवार, मे 25, 2021 7:52 PM
bumrah-workload
---Advertisement---

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आज जगातील आघाडीचा गोलंदाज आहे. काही वर्षांपूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी आपल्या या छोट्या कारकिर्दीत देखील त्याने वेगळा ठसा उमटवला आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो आज हुकूमत गाजवतो आहे. त्याच्या गोलंदाजीची भुरळ अनेक दिग्गजांना पडली आहे. यातीलच एक नाव म्हणजे न्यूझीलंडचे माजी दिग्गज खेळाडू रिचर्ड हॅडली. हॅडली यांनी नुकतेच बुमराहचे भरभरून कौतुक केले. मात्र त्याचवेळी त्यांनी एक सावधगिरीचा इशारा देखील भारताच्या या वेगवान गोलंदाजाला दिला आहे.

हॅडली यांनी सांगितला बुमराहला असलेला धोका
आयसीसीला दिलेल्या एका मुलाखतीत रिचर्ड हॅडली यांनी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीबाबत सविस्तर भाष्य केले. त्यांनी बुमराहला असलेल्या एका गोष्टीबाबत खुलासा केला. बुमराहची गोलंदाजी अ‍ॅक्शन काहीशी अपारंपरिक आणि नियमित वेगवान गोलंदाजांपेक्षा बरीच वेगळी आहे. मात्र याच अ‍ॅक्शनमुळे बुमराहला दुखापतींचा सातत्याने सामना करावा लागू शकतो, असे मत हॅडली यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, “बुमराह किती काळ क्रिकेट खेळू शकेल हे सांगणे कठीण आहे. कारण पारंपरिक अ‍ॅक्शन असलेल्या वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत बुमराहला अधिक दुखापतींना सामोरे जावे लागेल. त्याच्या या दुखापती त्याच्या कारकीर्दीसाठी मोठा धोका ठरू शकतात. जर त्याला दुखापत झाली तर ती गंभीर असू शकते, कारण त्याच्या अ‍ॅक्शनमुळे मुळातच त्याच्या शरीरावर अतिरिक्त ताण पडतो. मला आशा आहे की दुखापतींनी त्याची कारकीर्द संपणार नाही.”

असे असले तरी हॅडली यांनी याच अपारंपारिक अ‍ॅक्शनने बुमराह फलंदाजांना अडचणीत आणू शकतो, हे देखील मान्य केले. हॅडली यांनी “तो आपल्या गतीने, उसळीने आणि स्विंगने फलंदाजांना बाद करतांना पाहणे सुखावह असते”, अशा शब्दांत बुमराहचे कौतुक केले. हॅडली यांनी यावेळी भारतीय संघाचे देखील कौतुक केले. केवळ सर्वाधिक महसूल उत्पन्न मिळवण्यासाठी नव्हे तर कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी पण भारतीय संघाची जागतिक क्रिकेटला गरज असल्याचे विधान त्यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या – 

हे भारी आहे! ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये आता सचिन, विराटच्या नावाने असणार घराचा पत्ता

“भारताविरुद्ध शून्यावर बाद झाल्याने कर्णधाराचा ओरडा खावा लागला होता”

तेलही गेले अन् तूपही! पोलिस कोठडीत असलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारवर अजून एक संकट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---