---Advertisement---

पंतच्या फिटनेसबाबत सर्वात मोठी अपडेट! पाँटिंग म्हणतोय, ‘तो आयपीएल खेळेल, पण…’

On: बुधवार, फेब्रुवारी 7, 2024 6:11 PM
Ricky-Ponting-Rishabh-Pant
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मागच्या एका वर्षापेक्षा जास्त दिवसांपासून क्रिकेट खेळताना दिसला नाहीये. डिसेंबर 2022 मध्ये पंतच्या गाडीचा भिषण अपघात झाला होता. या अपघातात भारतीय क्रिकेटपटू सुदैवाने बजावला. मागच्या वर्षभरात त्याने अपेक्षेपेक्षा जांगले पुनरागमन केले आहे, असेच दिसते. दुखापतीतून बऱ्यापैकी सावरल्यानंतर पंत आगामी आयपीएल हंगाम खेळणार, अशा चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर रिकी पाँटिंग याने खास प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि महत्वाचा खेळाडू राहिला आहे. पण दुखापतीमुळे मागच्या आयपीएल हंगामात त्याला सहभाग घेता आला नाही. दिल्ली कॅपिटल्लचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आणि रिषभ पंत यांच्यातील नाते सर्वांना माहीत आहे. दोघांमध्ये अगदी मैत्रिपूर्ण संबंध आहेत. याच पार्श्वभूमीवर आयपीएल आयपीएलमध्ये पंत पुमरागमन कणार की नाही, हा प्रश्न पाँटिंगला विचारला गेला.

ईएसपीएन क्रिकइंफोच्या माहितीनुसार रिकी पाँटिंग म्हणाला, “रिषभ पंतला पूर्ण विश्वास आहे की, तो आयपीएल 2024 मध्ये खेळल. पण मैदानात उतरल्यानंतर तो काय-काय करू शकतो, हे अद्याप आम्हालाही खात्रीशीर सांगता येणार नाही. तुम्ही सोशल मीडियावर सर्वकाही पाहिले आहे. तो उभा राहिला आहे आणि धावत-पळत देखील आहे. पण आयपीएळ 2024 सुरू व्हायला फक्त 6 आठवडे बाकी आहेत. अशात तो आगामी हंगामात यष्टीरक्षक म्हणून खेळमार का, याविषयी खात्री नाहीये. पण एक गोष्ट निश्चित आहे की, मी त्याला कधीही विचारले, तर तो एवढेच सांगेल की, मी प्रत्येक सामना खेळेल. प्रत्येक सामन्यात यष्टीरक्षक बनेल आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीही करेल.”

“तो जबरदस्त खेळाडू आहे. तो संघाचा कर्णधार आहे, यात कुठलीच शंका नाहीये. मागच्या वर्षी त्याची कमी खूप जाणवली होती. जर मागच्या 12-13 महिन्यांमध्ये त्याची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर यादरम्यान त्याला अनेक अडचणी आल्या आहेत. मनाला धक्का देणारी घटना त्याच्यासोबत घडली आहे. या अपघातानंतर तो जिंवत आहे, यासाठी पंत स्वतःला नशिबवान समजतो. त्याने 14 पैकी 10 सामने जरी खेळले, तरी संघासाठी हा बोनस असेल.” रिकी पाँटिंगने यावेळी बोलताना पंत संघाचे कर्णधारपद करू शकले, याविषयी शंका उपस्थित केली. मागच्या हंगामात डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता. यावर्षीही वॉर्नरकडेच ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. (Ricky Ponting got an important update on Rishabh Pant’s fitness)

महत्वाच्या बातम्या – 
पंचांकडून लाईव्ह सामन्यात गडबड! निर्णय असा दिला की, गोलंदाजी करणाऱ्या संघालाच पडला प्रश्न
जसप्रीत जसबीर सिंग बुमराह! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘हा’ कारणामा पहिल्यांदाच, हलवली अख्खी ICC Ranking

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---