---Advertisement---

या कारणामुळे घडली चेंडू छेडछाडीची घटना, रिकी पाँटिंगने केला खूलासा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 14, 2020 7:50 PM
---Advertisement---

केपटाऊन (Cape Town), दक्षिण आफ्रिका (South Africa) येथे मार्च 2018 मध्ये झालेल्या कसोटी सामन्यातील चेंडू छेडछाडीमुळे (Ball Tempering) स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) यावर आपले मत मांडले आहे.

ही घटना संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अनुभवाच्या कमतरतेमुळे घडली होती. तेव्हा स्मिथच्या संघात या गोष्टीला ‘नाही’ असे म्हणणारा कोणताच खेळाडू नव्हता, असे पाँटिंग म्हणाला.

“ऑस्ट्रेलिया संघातून अनुभवी खेळाडूंच्या बाहेर जाण्यामुळे मी खूप चिंतेत होतो. अनुभव नसल्यामुळे संघातील इतर खेळाडूंना ‘नाही’ म्हणता येत नव्हते. गोष्टी पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेल्या होत्या,” ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार पाँटिंग असे म्हणाला.

केपटाऊन येथे झालेल्या या चेंडू छेडछाडीच्या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) आणि माजी उपकर्णधार डेविड वॉर्नरला (David Warner) 1 वर्षासाठी, तर कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला (Cameron Bancroft) 9 महिन्यांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तसेच देशांतर्गत क्रिकेटमधून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निलंबित केले होते.

आता या घटनेनंतर जवळजवळ 2 वर्षांनी ऑस्ट्रेलिया संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला आहे. 21 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 आंतरराष्ट्रीय टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व ऍरॉन फिंच करणार आहे.

तसेच चेंडू छेडछाड प्रकरणानंतर स्मिथ आणि वॉर्नरही पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---