ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने आधुनिक (मॉर्डन) युगातील पूर्ण 360 डिग्री खेळाडूचे नाव जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने आश्चर्यकारकपणे एबी डिव्हिलियर्सचे नाव घेतले नाही. रिकी पाँटिंगने सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांची पूर्ण 360 डिग्री खेळाडू म्हणून निवड केली आहे. खरे तर एबी डिव्हिलियर्स विश्व क्रिकेटचा पहिला 360 डिग्री खेळाडू म्हणून मानला जातो. परंतु रिकी पाँटिंगने डिव्हिलियर्सचे नाव न घेऊन अर्थातचं चाहत्यांना अचंबित केले आहे.
त्याच वेळी, पॉन्टिंगने सूर्या आणि मॅक्सवेलचे वर्णन पूर्ण 360 डिग्री खेळाडू म्हणून केले आहे. अलिकडच्या काळात सूर्याने आपल्या फलंदाजीने जागतिक क्रिकेटला चकित केले आहे, सूर्या आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना उद्ध्वस्त करणारा फलंदाज म्हणून उदयास आला आहे.विशेषत: सूर्या आणि मॅक्सवेल हे टी20 मध्ये वेगळ्या प्रकारचे फलंदाज आहेत. टी20 मध्ये त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे हे कोणत्याही गोलंदाजासाठी आव्हान असते.
सूर्याच्या करिअरबाबत बोलायचे झाले तर या 360 डिग्री फलंदाजाने 37 एकदिवसीय सामने खेळला आहे. ज्यामध्ये 773 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 105.02 च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी केला आहे. या शिवाय टी20 मध्ये सूर्याने 68 टी20 सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 2340 धावा केल्या आहेत. या फाॅरमॅटमध्ये सूर्याने आतापर्यंत 4 शतके ठोकल्या आहेत.
तर मॅक्सवेलबद्दल बोलायचे झाल्यास, या ऑस्ट्रेलियन विस्फोटक फलंदाजाने 138 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3895 धावा केल्या आहेत ज्यात त्याचा स्ट्राइक रेट 126.91 आहे. त्याच वेळी, टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये मॅक्सवेलने 113 सामन्यांमध्ये 2600 धावा केल्या आहेत ज्यात त्याचा स्ट्राइक रेट 154.76 आहे. मॅक्सवेलच्या नावावर टी20 मध्ये 5 शतके आहेत.
हेही वाचा-
3 खेळाडू जे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतून बाहेर झाले, एक जण तर रुग्णालयात दाखल!
पॅरिसच्या सीन नदीवर फडकला तिरंगा, 2024 ऑलिम्पिक खेळांना धडाक्यात सुरुवात
राहुल द्रविडचा विशेष संदेश, गाैतम गंभीर भावूक; बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ