---Advertisement---

पॉंटिंगने ‘या’ खेळाडूच्या पारड्यात टाकले भारताच्या कसोटी कर्णधारपदासाठी आपले मत

On: सोमवार, जानेवारी 31, 2022 11:58 PM
axar-patel-dc
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने दिलेल्या कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे भारताचा नवीन कर्णधार कोण? बीसीसीआयने अजूनही नवीन कर्णधाराची घोषणा केलेली नाही. भारताला फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (ind vs west indies) मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. त्यानंतर होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी बीसीसीआय कसोटी कर्णधाराची घोषणा करु शकतो. कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत अनेक नावे असुन, त्यातील पहिले नाव रोहित शर्माचे (rohit sharma) आहे. तो भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आहे. रोहितशिवाय केएल राहुल आणि रिषभ पंत ही नावे सुद्धा आघाडीवर आहेत. जास्तीत जास्त लोकांनी रोहितचे नाव सुचवले आहे. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅंटिंगनेही (ricky ponting) रोहितचे समर्थन केले आहे. तसेच अजिंक्य राहणेसुद्धा कर्णधारपदासाठी चांगला पर्याय असल्याचे त्याने म्हटले आहे.

पाॅंटिंग सध्या आयपीएल संघ दिल्ली कॅपीटल्सचा प्रशिक्षक आहे. यापुर्वी त्याने रोहित शर्मासोबत मुंबई इंडियन्स संघात काम केले आहे. २०१३ मध्ये पाॅंटिंगने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितला कर्णधारपद देण्यात आले. पाॅंटिंगनेच रोहितचे नाव सुचवले होते. आता पुन्हा एकदा पाॅंटिंगने रोहितच्या बाजुने आपले मत मांडले आहे. ऑस्ट्रेलियाला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराने एका मुलाखतीत सांगितले आहे की, “मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहितने जे यश मिळवले आहे तेच तो यशस्वी कर्णधार असल्याचा मोठा पुरावा आहे. त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेल्या काही सामन्यांमध्ये तो खूप यशस्वी ठरला आहे.”

पुढे पाँटिंग म्हणाला, “मी आधी म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या खेळात आघाडीवर असाल तर तुम्हाला कर्णधारपद मिळायलाच हवे. त्याने गेल्या दोन तीन वर्षांत जे काही केले आहे, त्यावर तर्क करणे फार कठीण आहे. रोहितने जगभरात शानदार फलंदाजी केली आहे आणि तो किती महान खेळाडू आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बीसीसीआयने त्यांना काय हवे आहे हे स्पष्ट केले पाहिजे. त्यांना सर्व प्रकारांमध्ये एकच कर्णधार हवा आहे? की वेगवेगळे कर्णधार हवे आहेत हे स्पष्ट केले पाहिजे.”

विराटच्या काळात उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेबद्दल बोलताना पाँटिंग म्हणाला, “खरं सांगायचं तर मी अजिंक्यसोबत काम केलं आहे. तो एक महान खेळाडू आहे. तो खुप शानदार खेळाडू आहे. मागील काही काळात त्याने कसोटी मालिकांमध्ये सर्वोत्तम फलंदाजी केलेली नाही. पण गेल्या उन्हाळ्यात ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत त्याने शानदार कामगिरी केली होती.”

 

महत्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामूळे स्टार्कने घेतली मेगा लिलावातून माघार; म्हणाला… (mahasports.in)

भारतीय दिग्गज म्हणतोय, “भुवनेश्वरचे भवितव्य काय?” (mahasports.in)

“‘माझी धोनीबद्दल नाही, तर बीसीसीआयबद्दल तक्रार आहे” (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---