भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्याच सामन्यापासून आपला दम दाखवला. दिल्ली येथे पार पडलेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभूत केले. हा सामना रिषभ पंतसाठी खूपच महत्त्वाचा होता. या सामन्यातून त्याने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण केले होते. मात्र, एकीकडे पराभूत झाल्यानंतर पंतवर टीका केली जात असतानाच ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग याने पंतची प्रशंसा केली आहे.
काय म्हणाला पाँटिंग?
रिषभ पंत (Rishabh Pant) याची प्रशंसा करताना रिकी पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाला की, “रिषभ पंत याने या वर्षीच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या आयसीसी टी२० विश्वचषकातील संघाचा भाग बनले पाहिजे. तो भारतासाठी एक असामान्यरीत्या खतरनाक ठरेल. कारण, तिथे सपाट आणि उसळी घेणारी खेळपट्टी आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “पंत एक अद्भूत खेळाडू आहे. तो भारतासाठी एक जबरदस्त खेळाडू म्हणून सिद्ध होईल.” दिल्ली कॅपिटल्स संघातील पंतची प्रगती पाहून पाँटिंगला जाणवले की, यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकादरम्यान पंतला ‘फ्लोटर’च्या रुपात वापरले पाहिजे.
‘गतीशील’ आणि ‘विस्फोटक’ क्रिकेटपटू लक्षात घेता, पंतला डावखुरा फलंदाज म्हणून विशिष्ट भूमिकेत वापरायला आवडेल, असे पाँटिंगला असे वाटते.
सामन्याचा आढावा-
भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात (INDvsSA First T20 Match) पहिल्यांदा फलंदाजी करताना ४ विकेट्स गमावत २११ धावांचा डोंगर उभा केला होता. यादरम्यान इशान किशन याने सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात त्याने ४८ चेंडूंचा सामना करताना ७६ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ३ षटकार आणि ११ चौकारही मारले. भारताने दिलेल्या २१२ धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने १९.१ षटकात ५ चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले. यावेळी त्यांच्याकडून रस्सी व्हॅन डर दुसेन याने नाबाद ७५ आणि डेविड मिलर याने नाबाद ६४ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्ट्राईक देण्याच्या वादावर आशिष नेहराचा कार्तिकला पाठिंबा, पंड्याला झापत म्हणाला, ‘तिथं मी नव्हतो…’
आयसीसीने बुमराहला घातलीय मानाची ‘टोपी’, पण का केला गेलाय ‘बूम बूम’चा सन्मान?
आयपीएलने भारताला दिलेला पहिला टी२० स्टार होता युसुफ, इरफानचा भाऊ ओळख पुसत त्याने स्वत:ची बनवलेली ओळख