---Advertisement---

तू सर्वोत्तम ठरला! पॉंटिंगकडून वॉर्नला भावनिक श्रद्धांजली

On: शनिवार, मार्च 5, 2022 5:17 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दिवंगत शेन वॉर्नसोबतच्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील दिवसांमध्ये घालवलेले जुने क्षण आठवून भावूक झाला. पाँटिंग म्हणाला की, मी यावेळी अवाक आहे.‌ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न याचे शुक्रवारी ( ४ मार्च) थायलंडमधील व्हिलामध्ये निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ५२ वर्षीय वॉर्न क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर समालोचक म्हणून सक्रिय होता.

पाँटिंग आणि शेन वॉर्नने दीर्घकाळ एकत्र क्रिकेट खेळले. दोघांनीही आपल्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला अनेक सामन्यांत विजय मिळवून दिला. शेन वॉर्नच्या मृत्यूची बातमी समजताच पॉन्टिंगने सोशल त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले, ‘शब्दात वर्णन करणे कठीण आहे. तुझी आणि माझी पहिली भेट वयाच्या १५ व्या वर्षी अकादमीत झाली. तू मला माझे टोपणनाव दिले. आम्ही एका दशकाहून अधिक काळ संघात एकत्र होतो. या काळात आम्ही चढ-उतार एकत्र पाहिले. तू स्वतः च्या कुटुंबाची काळजी घेणारा एक पालक होतास. संघासाठी गरज असताना तू नेहमी पुढे येत. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत सोबत आणि विरुद्ध खेळलेला तू सर्वोत्तम गोलंदाज ठरला.’

जगभरातील फलंदाजांना आपल्या फिरकीने नाचवणाऱ्या वॉर्नच्या अकाली निधनाने अवघ्या जगाला धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी तो सामन्यादरम्यान मैदानावर दिसला होता. सचिन तेंडुलकरपासून ते ब्रायन लारापर्यंत सर्वांनी त्याच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. वॉर्नच्या कुटुंबाला व्हिक्टोरियन सरकारने राज्य सन्मान देऊ केला आहे.

अजरामर राहीली कारकीर्द

शेन वॉर्न हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वोत्कृष्ट लेगस्पिनर म्हणून ओळखला जातो. वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर कसोटी पदार्पण केले होते. त्याने १४५ कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्याने ७०८ विकेट घेतल्या. वॉर्नने १९४ वनडेत २९३ विकेट घेतल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने चाहते शोकसागरात; फूल, बियरसह आवडत्या वस्तू देत वाहिली श्रद्धांजली (mahasports.in)

दक्षिण आफ्रिका महिला संघाची विश्वचषकात विजयी सलामी; बांगलादेशला चारली धूळ (mahasports.in)

शेन वॉर्नची शेवटची २० मिनिटे, नेमकं काय घडलं होतं? वाचा संपूर्ण घटनाक्रम (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---