---Advertisement---

आणि धोनीला कर्णधार म्हणून सोडा खेळाडू म्हणूनही नाही मिळाली संधी

---Advertisement---

2010-2019 हे दशक संपत आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅंटिंगने (Ricky Ponting) या दशकात चांगली कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंचा (Best Players in this Decade) कसोटी संघ (Team XI) तयार केला आहे.

पाॅंटिंगच्या संघाचे नेतृत्व या दशकातील आयसीसी आणि वनडे क्रमवारीत अव्वल असणाऱ्या विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे ज्याला पाॅंटिंगच्या या कसोटी संघात स्थान मिळाले आहे.

परंतु, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) यात कोणतेही स्थान देण्यात आले नाही.

पाॅंटिंगने सोमवारी (30 डिसेंबर) आपल्या कसोटी संघाची यादी ट्विटरवर शेअर केली आहे.

 

“प्रत्येकजण या दशकातील चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना घेऊन आपला संघ निर्माण करत आहेत. तर, मी म्हटलं आपण सुद्धा सहभागी झाले पाहिजे,” असे पाॅंटिंगने आपल्या ट्वीटमध्ये कॅप्शन देताना म्हटले आहे.

धोनीने भारतीय संघाचे सर्वाधिक६० कसोटी सामन्यात नेतृत्व केले असून त्यात २७ विजय मिळवुन दिले आहेत तर विराटने ५३ सामन्यात नेतृत्व करताना ३३ कसोटी सामने जिंकले आहेत.

पाॅंटिंगने निवडलेला या दशकातील सर्वोत्कृष्ट कसोटी संघ- 

डेव्हिड वाॅर्नर, ऍलिस्टर कूक, केन विलियमसन, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली (कर्णधार), कुमार संगकारा (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, डेल स्टेन, नॅथन लायन, स्टुअर्ट ब्राॅड, जेम्स अँडरसन.

मागील आठवड्यात विराटला विस्डेननेही दशकातील वनडे संघात सामील केले होते. त्याचबरोबर त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) आणि गौतम गंभीरने (Gautam Gambhir) त्यांच्या संघात सामील करून घेतले होते.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---