इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या प्रतिष्ठेची ऍशेस मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तीन सामने पार पडले असून पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने 2-1 अशी आघाडी घेतलीये. पहिले दोन सामने गमावल्यानंतर इंग्लंडने पुनरागमन करत तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयात वेगवान गोलंदाज मार्क वूड याचा सिंहाचा वाटा राहिला. त्याच्या या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने त्याचे कौतुक केले.
रिकी पॉंटिंग याने नुकतीच आयसीसीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्याने आपली मते व्यक्त केली. या मुलाखतीत त्याने मार्क वूड याचे कौतुक करताना त्याची तुलना ऑस्ट्रेलियाच्या दोन दिग्गजांशी केली. तो म्हणाला,
“मला वूडमध्ये थोडा मिचेल जॉन्सन आणि थोडा ब्रेट ली वाटतो. जे त्यांच्या काळात अगदी सर्वोत्तम कामगिरी करत होते. पहिला बदल म्हणून गोलंदाजीला येणे. तुफान वेगात गोलंदाजी करणे. थोडी जरी मदत असली तरी फलंदाजांना अक्षरशा हैराण करून सोडणे, या सर्व खुबी त्याच्यात आहेत. तो इंग्लंड संघासाठी एक महत्त्वाचे साधन आहे.”
वूड हा मालिकेतील पहिला दोन कसोटीत संघाचा भाग नव्हता. मात्र, तिसऱ्या सामन्यात संघात समावेश होताच त्याने आपल्या वेगाने ऑस्ट्रेलियन संघाला हैराण केले. पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन बळी घेत त्याने इंग्लंडच्या विजयात हातभार लावला. विशेष म्हणजे त्याने या संपूर्ण सामन्यात दीडशेपेक्षा जास्तच्या वेगाने गोलंदाजी केली. मालिकेतील उर्वरित दोन सामन्यात त्याच्याकडून इंग्लंड संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
(Ricky Ponting Said Mark Wood Is Like Combination Of Mitchell Johnson And Brett Lee)
महत्वाच्या बातम्या –
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ४ च्या रोमांचक सामन्यांचा आनंद घेतला
बेअरस्टोच्या विवादित स्टंपिंगवर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, ‘मी आधीही असं…’