---Advertisement---

मुंबई विरुद्धच्या सामन्यापूर्वी दिल्ली प्रशिक्षक पाँटिंगने भरली हुंकार, ‘आमच्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास, ते…’

Ricky-Ponting-Rishabh-Pant
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६९ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. शनिवारी (२१ मे) हा सामना वानखेडे स्टेडियवर आयोजित करण्यात आला आहे. आयपीएल २०२२ च्या प्लेऑफचे चित्र स्पष्ट होण्यासाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे. कारण, या सामन्यानंतर आयपीएल प्लेऑफमध्ये पोहचणारा चौथा संघ मिळणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

आयपीएल २०२२ प्लेऑफमध्ये (IPL 2022 Playoffs) गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या तीन संघांनी जागा पक्की केली आहे. आता चौथ्या क्रमांकासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात कडवी टक्कर आहे. जर शनिवारी दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला पराभूत केले, तर दिल्ली प्लेऑफची फेरी गाठेल, तर बेंगलोरचे आव्हान संपुष्टात येईल. पण, जर मुंबईने दिल्लीला पराभूत केले, तर दिल्ली स्पर्धेतून बाहेर होईल आणि बेंगलोर प्लेऑफमध्ये पोहचेल.

त्याचमुळे शनिवारी होणारा सामना (Mumbai Indians vs Delhi Capitals) निर्णायक ठरणार आहे. या सामन्यापूर्वी बोलताना रिकी पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाला, त्याला दिल्ली संघातील खेळाडूंवर विश्वास आहे.

खेळाडूंवर आहे विश्वास  – पाँटिंग
पाँटिंग सामन्याबद्दल बोलताना म्हणाला, ‘मला खेळाडूंवर पूर्ण विश्वास आहे की, ते शनिवारी खरंच चांगला खेळ करतील. आम्ही या सत्रात पहिल्यांदाच सलग दोन सामने जिंकले आहेत. आमच्यासाठी हा हंगाम चढ-उतारांचा राहिला आहे. पण आम्ही काही चांगले क्रिकेटही खेळले आहे. मी नेहमीच स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यांत आपले सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळण्याच्या आणि योग्यवेळी लय मिळवण्याच्या बाबत चर्चा करत असतो. मला असे वाटत आहे की, खेळाडू असे करतील.’

पाँटिंग खेळाडूंचे कौतुक करताना म्हणाला, ‘वॉर्नरने सलामीला चांगले प्रदर्शन केले आहे. तसेच आपण हे देखील पाहिले आहे की, तिसऱ्या क्रमांकावर मिशेल मार्श किती आक्रमक होऊ शकतो. गोलंदाजीत कुलदीपने शानदार कामगिरी केली आहे. तसेच अक्षर पटेलनेही किफायतशीर गोलंदाजी केली आहे.’

पाँटिंगने शार्दुल ठाकूरचेही कौतुक केले. तो म्हणाला, ‘शार्दुलने गेल्या काही सामन्यांत चांगली लय मिळवली आहे. आमच्या वरिष्ठ खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, काही चांगले संकेत आहेत. मोठ्या सामन्यांत आपल्याला अनुभवी खेळाडूंची गरज असते. मला वाटते मागील काही आठवडे संघाचे वातावरण वेगळे राहिले आहे आणि खेळाडूंना याचे पूर्ण श्रेय आहे. प्रशिक्षक म्हणून आम्ही खेळाडूंना पुढील आव्हानासाठी तयार करत आहे.’

दिल्लीने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये १३ सामने खेळले असून ७ सामन जिंकले आहेत आणि ६ सामने पराभूत झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

चेन्नई सुपर किंग्ज याच दिवशी ५ वर्षांपूर्वी खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सच्या खूप मागे पडली

जेव्हा पाकिस्तानच्या खेळाडूचे वनडे द्विशतकाचे स्वप्न भंगले होते सचिन तेंडूलकरमुळे

सचिन, द्रविड व गांगुलीला शून्यावर बाद करणारा एकमेव गोलंदाज, पाहा काय आहे त्याचे नाव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---