ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने फिरकीपटू शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहिली असून, तो इंग्लंडचा प्रशिक्षक बनला असता तर, त्याच्या खेळातील प्रचंड ज्ञानामुळे त्याने आपली भूमिका चोख बजावली असती, असे म्हटले आहे. ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ०-४ असा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर इंग्लंडने मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांची त्यांच्या पदावरून हकालपट्टी केली होती. थायलंडमध्ये त्याच्या आकस्मिक निधनाच्या काही आठवड्यांपूर्वी वॉर्नने इंग्लंडचे प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम या महान फिरकीपटूच्या नावावर आहे. वॉर्नने कसोटीत ७०८ आणि वनडेमध्ये २९३ विकेट घेतल्या आहेत.
रिकी पॉन्टिंगने ‘द आयसीसी रिव्ह्यू’मध्ये होस्ट ईशा गुहाला सांगितले, “त्याची (वॉर्नची) आवड आणि खेळाचे ज्ञान आश्चर्यकारक होते. उत्तम प्रशिक्षक होण्याचे सर्व गुण त्याच्यात होते. जर वॉर्नसारखा कोणी इंग्लंड क्रिकेट संघात सामील झाला असता तर, मला वाटते की त्याने चांगले काम केले असते.”
A brave interview from Ricky Ponting as he remembers Shane Warne – watch the full tribute here ➡️ https://t.co/OcEz4CWiCX pic.twitter.com/iLKJPrp8ua
— ICC (@ICC) March 7, 2022
तो म्हणाला, ‘हे क्रीडा जगताचे मोठे नुकसान आहे. त्याने काही कोचिंग केले असेल किंवा तो ज्या पद्धतीने बोलायचा, त्याच्या समालोचनातून तो आम्हाला सांगत असे, मला वाटते की आपण सर्वजण त्याची आठवण काढू.’ वॉर्नने त्याच्याशी झालेल्या चर्चेत इंग्लंडचा प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली होती, याचादेखील खुलासा केला.
जगातील सर्वोत्तम फिरकीपटू असलेला वॉर्न वयाच्या ५२ व्या वर्षी निधन पावला. थायलंड येथे सुट्ट्या घालवत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे आकस्मित निधन झाले होते. त्यानंतर जगभरातील क्रिकेटपटू व चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याच्यावर ऑस्ट्रेलियात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
इंजीच्या पुतण्याने कांगारुंना चोप चोप चोपलं, पहिल्याच कसोटीत रचले मोठे विक्रम (mahasports.in)
जर्मन ओपन स्पर्धेत सिंधू-श्रीकांतचा विजयाने श्रीगणेशा; लक्ष सेनवरही राहणार नजर (mahasports.in)