---Advertisement---

जर्मन ओपन स्पर्धेत सिंधू-श्रीकांतचा विजयाने श्रीगणेशा; लक्ष सेनवरही राहणार नजर ‌

On: मंगळवार, मार्च 8, 2022 8:44 PM
kidambi-srikant
---Advertisement---

दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारी महिला भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि जागतिक स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारा पुरुष बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत यांनी जर्मन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक दिली.‌ एक लाख ८० हजार अमेरिकन डॉलर्स बक्षीस रक्कम असलेल्या स्पर्धेमध्ये अनेक भारतीय सहभाग नोंदवत आहेत.

सातव्या मानांकित सिंधू हिने थायलंडच्या बुसानन हिला २१-८,‌‌‌२१-७ असे सहजरीत्या पराभूत केले. यासह तिने तब्बल १५ व्या वेळी बुसानन‌ हिला पराभुत करण्याची कामगिरी केली. दुसरीकडे, पुरुष गटात आठव्या मानांकित श्रीकांत याने फ्रान्सच्या ब्रुस लेवेरेजला ४८ मिनिटांमध्ये २१-१०, १३-२१ व २१-७ असे पराभूत केले. लेवेरेज आत्तापर्यंत चौथ्यांदा श्रीकांत विरुद्ध पराभूत झालेला आहे. जानेवारी महिन्यात इंडियन ओपनवेळी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर श्रीकांत प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत आहे.

मिश्र दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिकी रेड्डी व साई प्रतिक यांना या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले. त्यांना प्रथम मानांकित थायलंडच्या डेचापोल पुरानुक्रोव व‌ सापचिरी यांनी २२-१९, २१-८ असे पराभूत केले. भारताचा दुसरा पुरुष खेळाडू लक्ष सेन आपल्या अभियानाची सुरुवात बुधवारी (९ मार्च) करेल.

महत्वाच्या बातम्या-

वयाच्या २२ व्या वर्षी राहुल चाहर अडकणार लग्नबंधनात, त्याच्या भावी पत्नीबद्दल घ्या जाणून (mahasports.in)

इंजीच्या पुतण्याने कांगारुंना चोप चोप चोपलं, पहिल्याच कसोटीत रचले मोठे विक्रम (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---