भारतीय संघाचा युवा फिरकी गोलंदाज राहुल चाहर बुधवारी (९ मार्च) लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. फॅशन डिजाइनर ईशानी जोहर सोबत राहुल त्याचा संसार थाटणार आहे. मागच्या मोठ्या काळापासून ते एकमेकांना ओळखतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते रिलेशनमध्येही आहेत. दोघांचे लग्न गोव्यामध्ये होणार आहे आणि त्यासाठी अनेक क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राहुल चाहर (Rahul Chahar) आणि ईशानी जोहर (Ishni Johar) यांचा मागच्या दोन वर्षांपूर्वीच साखरपुडा पार पडला होता. आता ते गोव्यातील एका हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. लग्नासाठी राहुलचे संपूर्ण कुटुंब गोव्याला रवाना झाले आहे. ज्या हॉटेलमध्ये लग्न आयोजित केले गेले आहे, ते हॉटेल वेस्टर्न गोव्यात आहे.
राहुलची होणारी पत्नी ईशानीचा जन्म १९९९ साली झाला असून माध्यमांतील वृत्तानुसार या दोघांमध्ये बालपणापासून चांगली मैत्री आहे. तसेच ईशानीने दिल्ली आणि जयपूरमधून शालेय शिक्षण पूर्ण केले असून तिने राजस्थान विद्यापिठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ती अनेकदा सामन्यांदरम्यानही राहुलला प्रोत्साहन देण्यासाठी स्टँडमध्ये हजर असल्याचे दिसले आहे.
भारतीय क्रिकेटपटू लग्नासाठी उपस्थित राहाण्याची शक्यता
मंगळवारी (८ मार्च) लग्नाच्या आधीचा मेहेंदीचा कार्यक्रम घेतला जाईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी हळदी समारंभ होईल आणि रात्री लग्न पार पडेल. बुधवारी रात्री इतर पारंपारिक कार्यक्रमही होतील. राहुल आणि ईशानीच्या लग्नानंतर १२ मार्च रोजी आगऱ्याच्या एका हॉटेलमध्ये रिसेप्शन आयोजित केले गेले आहे.
भारतीय संघ (Team India) सध्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकते व्यस्त आहे. पण तरीही राहुलच्या लग्नासाठी अनेक खेळाडू उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. लग्नानंतर रिसेप्शनलाही खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित असतील. आयपीएल फ्रेंचायझींसोबतचे दिग्गजही उपस्थित राहण्याची शक्यत आहे. राहुलचा चुलत भाऊ दीपक चाहर (Deepak Chahar) सध्या एनसीएमध्ये दुखपतीतून सावरण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण दीपक लग्नासाठी थेट गोव्यामध्ये पोहोचणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
https://www.instagram.com/p/CZ8ivFxBTbC/
राहुलची कारकिर्द
राहुलच्या कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतीय संघासाठी एकमात्र एकदिवसीय सामना खेळला आहे. हा सामना त्याने २०२१ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध खेळला होता आणि यामध्ये ५४ धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या होत्या. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये राहुलने भारतीय संघासाठी ६ सामने खेळले आणि यामध्ये ७ विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये राहुल २०१९ पासून खेळत आला आहे. आयपीएलमध्ये खेळलेल्या ४२ सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ४३ विकेट्स आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘बाप’माणूस गेल्यानंतर त्यांच्या स्वप्नासाठी झटलेली स्नेह राणा आता बनलीय टीम इंडियाची ‘संकटमोचक’
IPL 2022: हार्दिक नेतृत्त्व करणाऱ्या गुजरातचे काय आहे बलस्थान आणि कमजोरी, कसा आहे संघ? घ्या जाणून






