---Advertisement---

‘या’ व्यक्तीने अजिंक्य रहाणेला बेंगलोरविरुद्ध पाठवले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला

On: मंगळवार, नोव्हेंबर 3, 2020 12:27 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० मध्ये सोमवारी(२ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवत दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दिल्लीच्या या विजयात अजिंक्य रहाणेने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर का फलंदाजी केली, याबद्दल रहाणेने सामन्यानंतर खुलासा केला आहे.

रहाणे म्हणाला, ‘रिकी पाँटिंगने मला इथे आल्यानंतर सांगितले की मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची आहे. हा फलंदाजीसाठी खूप चांगला क्रमांक आहे. आमच्या गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. पण मला शिखर धवन बरोबर फलंदाजी करताना मजा आली. आम्ही लक्ष्याचा जास्त विचार करु शकत नव्हता. आम्ही केवळ चांगले शॉट्स खेळण्यावर लक्ष दिले.’

रहाणेने या सामन्यात ४६ चेंडूत ६० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार मारला. तसेच शिखर धवनबरोबर दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. धवनने ४१ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. या सामन्यात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज असताना रहाणे बाद झाला. त्यामुळे रहाणे नाराज झाला होता.

याबद्दल रहाणे म्हणाला,  ‘बाद होणे निराशाजनक होते. मला हा सामना संपवूनच जायचे होते. पण आपल्याला माहित आहे की हा किती गमतीशीर खेळ आहे. पण शेवटी सामना जिंकणे आणि प्लेऑफमध्ये प्रवेश करणे महत्त्वाचे होते.’

या सामन्यात बेंगलोरने दिल्लीला १५३ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने १९ षटकात पूर्ण केले. दिल्लीचा पुढील सामना आता प्लेऑफच्या क्वालिफायर १ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“पराभूत होऊनही क्वालिफाय होणाऱ्याला RCB म्हणतात “, प्ले ऑफमध्ये स्थान मिळवल्यानंतर मीम्स व्हायरल

आयपीएलनंतर आता फाफ डू प्लेसिस करणार ‘या’ मोठ्या स्पर्धेत पदार्पण; पोलार्डची घेणार जागा

इतिहासाची होणार पुनरावृत्ती? प्लेऑफच्या शर्यतीत असूनही कोलकाताला सतावतेय ‘या’ गोष्टीची भीती

ट्रेंडिंग लेख –

IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर

वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

…आणि रोहितचा रो’हिट’ झाला!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---