सध्या भारतात शेतकरी आंदोलनाचे लोण पसरले आहे. राजकीय पक्षांव्यतिरिक्त अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटी या विषयावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेची पॉपस्टार रिहाना हिने या विषयावर आपले मत व्यक्त केले होते. मात्र, त्यानंतर अनेक भारतीय खेळाडूंनी ‘इंडिया टुगेदर’ हा हॅशटॅग ट्रेंड केला होता. परंतु, रिहाना व क्रिकेट यांचा खूप जुना संबंध आहे. आता, प्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेल व कधी खाना यांचा एक व्हिडिओ जबरदस्त फायर होत आहे.
कोण आहे रिहाना?
रिहाना ही अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप गायिका आहे. मूळ बार्बाडोस येथील रहिवासी असलेली रिहाना सध्या अमेरिकेत वास्तव्य करते. तिला आत्तापर्यंत ९ वेळा प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. तसेच अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर तिने नाव कोरले आहे. जवळपास ४४ अरब रुपये इतकी संपत्ती असलेली रिहाना आपल्या दानशूर स्वभावासाठी ओळखली जाते.
रिहाना यापूर्वीपासून अनेक सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर आवाज उठवत आहे. रिहाना हिने मागे म्यानमारच्या परिस्थितीविषयी ट्विट केले होते ज्याचा दूरगामी परिणाम झाला होता. रिहाना हिने २०१२ मध्ये क्लारा लिओनेल फाउंडेशनची स्थापना केली, जे जगभरातील शिक्षण आणि इतर कामांसाठी कार्यरत आहे. मागील वर्षी जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीवेळी तिने जवळपास ३६ कोटी रुपये दान केले होते.
रिहाना आणि क्रिकेट
रिहाना आणि क्रिकेट यांचादेखील अगदी नजीकचा संबंध आहे. रिहाना व वेस्ट इंडिजचा प्रमुख खेळाडू कार्लोस ब्रेथवेट हे वर्गमित्र आहेत. त्यामुळे रिहानाची अनेक वेस्ट इंडियन क्रिकेटपटूंशी चांगली ओळख आहे. क्रेग ब्रेथवेट हा देखील तिचा मित्र आहे. मागे, कार्लोस ब्रेथवेटने एका मुलाखतीत म्हटले होते की, तो नृत्य स्पर्धेत रिहानाला सहज पराभूत करेल. इंग्लंडमध्ये आयोजित २०१९ क्रिकेट विश्वचषकावेळी ती वेस्ट इंडीज संघाला समर्थन देत होती. त्याचवेळी, वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल व रिहाना यांनी वेस्ट इंडीजच्या ड्रेसिंग रूममध्ये एकत्र नृत्य केले होते.
When @rihanna met the Universe Boss 🎤 🌎#CWC19 | #MenInMaroon pic.twitter.com/a5lt6fVIFx
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) July 1, 2019
रिहानाने वेधले होते शेतकरी आंदोलनावर लक्ष
रिहानाने काही दिवसांपूर्वी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी ट्विट केले होते. त्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी हा मुद्दा उचलून धरला. त्याला उत्तर म्हणून भारतातील सेलिब्रिटींनी ‘इंडिया टुगेदर’ या हॅशटॅगसह भारतातील मुद्दा भारतीय सोडवतील, त्यात बाहेरील व्यक्तींनी नाक खुपसू नये असे म्हटले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू व अभिनेत्यांना चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
महत्वाच्या बातम्या:
कुलदीप यादवला संघात स्थान न दिल्याने गंभीरची संघ व्यवस्थापनावर टीका; म्हणाला
म्हणून इंग्लंड संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी दरम्यान दंडाला बांधली काळी पट्टी