भारताचा स्टार खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) सध्या उत्तर प्रदेश टी20 लीग (UP T20 League 2024) मध्ये मेरुट मार्विक्सचा कर्णधार आहे. (25 ऑगस्ट) पासून सुरू झालेल्या स्पर्धेचा पहिला सामना रिंकू सिंगच्या (Rinku Singh) मेरुट मार्विक्स आणि काशी रुद्रस यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कर्णधार रिंकूनं आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. रिंकूनं 350च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली आणि संघाला धमाकेदार विजय मिळवून दिला.
दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रिंकू सिंह 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. जेव्हा रिंकू फलंदाजीसाठी आला, तेव्हा मेरुट मार्विक्सला जिंकण्यासाठी फक्त 5 धावा करण्याची आवश्यकता होती. रिंकूनं पहिल्या चेंडूवर धाव घेतली. जेव्हा रिंकू पुन्हा स्ट्राईकवर आला तेव्हा जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज होती. रिंकूनं एकही धाव न घेण्याचा निर्णय घेतला आणि जोरदार षटकार ठोकून संघाला विजय शानदार मिळवून दिला.
रिंकूनं या सामन्यात 2 चेंडूमध्ये 7 धावांची खेळी खेळली. त्यामध्ये त्यानं 1 धमाकेदार षटकार ठोकला. दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 350 राहिला. विशेष म्हणजे, रिंकूच्या नेतृत्वाखाली मेरुट मार्विक्सनं 9 षटकांतच सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय फिरकीपटू अश्विनसोबत फसवणूक? इंडिगो एअरलाइन्सवर ओढले ताशेरे; नेमकं प्रकरण काय
‘जखमेवर मीठ’ लाजिरवाण्या पराभवानंतर आयसीसीनं पाकिस्तानला सुनावली मोठी शिक्षा
रोहित शर्माला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्जची खास रणनिती! संजय बांगर यांचा खुलासा