सध्या भारत-इंग्लंड संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. त्यातील 3 सामने खेळले गेले. त्यामध्ये भारताने 2 तर इंग्लंडने 1 विजय मिळवला. आता दोन्ही संघातील चौथा टी20 सामना पुण्याच्या महाराष्ट क्रिकेट असोसिएशन (एमसीए) या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळू शकतात. शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला 26 धावांनी पराभवाचा सामना देखील करावा लागला होता.
दरम्यान आता रिंकू सिंहबाबत (Rinku Singh) अधिकृत माहिती समोर आली आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफ रायन टेंडेस्केटने रिंकू चौथ्या टी20 सामन्यात खेळणार असल्याची पुष्टी केली आहे. पहिल्या टी20 नंतर पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे रिंकू संघाबाहेर होता. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला (Dhruv Jurel) संधी देण्यात आली, परंतु तो फिनिशरची भूमिका बजावण्यात यशस्वी ठरला नाही.
पुण्यात होणाऱ्या चौथ्या टी20 मध्ये शिवम दुबेलाही (Shivam Dube) संधी मिळण्याची अपेक्षा आहे. खरेतर, भारतीय खेळाडू इंग्लंडच्या लेग स्पिनर आदिल रशीदला (Adil Rashid) खेळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत दुबेला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
एकूण भारतीय संघ 3 बदलांसह चौथ्या टी20 सामन्यात मैदानात उतारू शकतो. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) संघातून वगळले जाऊ शकते. याशिवाय लेग स्पिनर रवी बिश्नोईलाही (Ravi Bishnoi) वगळण्यात येईल. या दोघांव्यतिरिक्त, ध्रुव जुरेल देखील अडचणीत येऊ शकतो. या तिघांच्या जागी अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), रिंकू सिंह (Rinku Singh) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांना संधी मिळू शकते.
चौथ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11 – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या-
“कोहलीला गोलंदाजी द्या” अरूण जेटली स्टेडियमवर चाहत्यांची मागणी, पाहा VIDEO
पदार्पणाच्या सामन्यातच ऑस्ट्रेलियन फलंदाजाची शतकी खेळी, श्रीलंका बॅकफूटवर
पाचव्या दोशी इंजिनिअर्स ट्राॅफी आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्स संघाला विजेतेपद