जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा पुढील हंगाम सुरू होण्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी मात्र दोन वेळचा विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स काहीसा अडचणीत सापडला आहे. संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याला पाठीचे दुखापत झाली असून, तो सुरुवातीचे काही सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत केकेआर नवा कर्णधार म्हणून युवा फलंदाज रिंकू सिंग याच्याकडे संघाचे नेतृत्व देऊ शकते.
श्रेयस याला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या अहमदाबाद कसोटी वेळी पाठीच्या दुखण्याचा त्रास जाणवू लागला. यामुळे तो फलंदाजीसाठी देखील उतरू शकला नव्हता. उभय संघातील वनडे मालिकेतून देखील तो बाहेर झाला आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, या दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या जवळपास पाच ते सहा सामन्यांना मुकू शकतो. अशा परिस्थितीत संघाचे नेतृत्व रिंकू सिंग हा करताना दिसण्याची शक्यता आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, श्रेयसच्या अनुपस्थितीत अनपेक्षितपणे केकेआरचे नेतृत्व रिंकू सिंग करताना दिसण्याची दाट शक्यता आहे. संघ व्यवस्थापनातील काही व्यक्तींनी याला पाठिंबा देखील दर्शवला असून, अनुभवी खेळाडूंची देखील यासाठी अनुमती आहे.
उत्तर प्रदेशसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रिंकू याच्या आयपीएल कारकीर्दीचा विचार केल्यास, त्याने आत्तापर्यंत 5 केवळ 17 सामने खेळत 251 धावा केल्या आहेत. कर्णधार म्हणून त्याच्या नावाची चर्चा असली तरी, त्याला संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंशी देखील स्पर्धा करावी लागू शकते. यामध्ये नितीश राणा, सुनील नरीन, आंद्रे रसेल व शाकिब अल हसन यांचा समावेश आहे.
(Rinku Singh Might Lead KKR In IPL 2023 Due To Shreyas Iyer Injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! हरमनप्रीतने भिरकावला चेंडू, पण सीमारेषेवर ‘सुपरवुमन’ हरलीनने पकडला अफलातून कॅच, पाहा Video
वर्ल्डकपनंतर रोहितचा पत्ता कट करून हार्दिक बनू शकतो भारताचा पर्मनंट कॅप्टन, गावसकरांची मोठी भविष्यवाणी