---Advertisement---

टीम इंडियाचा सर्वात मोठा फिनिशर, 54 ची सरासरी, तरी ही दुलीप ट्राॅफीतून वगळले! या खेळाडूची प्रतिभा धूळखात?

On: गुरूवार, ऑगस्ट 15, 2024 6:46 AM
Rinku Singh
---Advertisement---

आगामी भारताची देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धा 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. तत्तपूर्वी या स्पर्धेसाठी खेळाडूंची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत. बीसीसीआयने यासाठी भारतीय क्रिकेटमधील जवळपास प्रत्येक खेळाडूची नावाची निवड करण्यात आली आहे. मात्र आयपीएल आणि भारतासाठी फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या रिंकू सिंगकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. वास्तविक, रिंकू सिंगची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी चांगली असताना देखील त्याला दुलीप ट्राॅफीसाठी निवड करण्यात आले नाहीये.

रिंकू सिंगच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आता पर्यंत 54.70 च्या सरासरीने 47 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 71.59 च्या स्ट्राईक रेटने 3173 धावा केल्या आहेत. मात्र हे उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही दुलीप ट्रॉफीसाठी रिंकू सिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले.

भारतीय संघातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास,  रिंकू सिंगने टीम इंडियासाठी 23 टी20 सामने आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने वनडे सामन्यात 27.50 च्या सरासरीने आणि 134.14 च्या स्ट्राईक रेटने 55 धावा केल्या आहेत. वास्तविक, हा खेळाडू भारतीय संघात फिनिशर म्हणून वापरला गेला आहे. त्याच बरोबर रिंकू सिंगने सुद्धा त्याच्या फिनिशरची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. दुसरीकडे, टी20 मध्ये रिंकू सिंगने 59.71 च्या उत्कृष्ट सरासरीने आणि 134.14 च्या स्ट्राइक रेटने 418 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये रिंकू सिंगची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 69 धावा आहे. याशिवाय त्याने दोनदा पन्नास धावांचा टप्पा ओलांडला आहे.

अशाप्रकारे, या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, प्रथम श्रेणी सामन्यांव्यतिरिक्त रिंकू सिंगने भारतासाठी उत्कृष्ट फलंदाजी दाखवली आहे, परंतु रिंकू सिंगची दुलीप ट्रॉफीसाठी निवड न करणे हा आश्चर्याचा निर्णय आहे. वास्तविक, दुलीप ट्रॉफीसाठी रिंकू सिंगची निवड का करण्यात आली नाही याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा-

मोठी अपडेट: सीएएसने फेटाळली विनेश फोगटची मागणी! नाही मिळणार रौप्य पदक
हार्दिक पांड्या पुन्हा डेट करतोय? कोण आहे सोशल मीडिया स्टार जास्मिन वालिया?
ब्रेकिंग बातमी: मोर्ने मॉर्केलची टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---